Join us
Daily Top 2Weekly Top 5

चारकोपमधील बांधकाम व्यावसायिकाचा विवाहितेवर बलात्कार, गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 01:54 IST

पती आणि मुलांना ठार मारण्याची धमकी देत, एका बांधकाम व्यावसायिकाने गेल्या आठ वर्षांपासून बलात्कार केल्याप्रकरणीची फिर्याद, एका विवाहितेने चारकोप पोलीस ठाण्यात दिली आहे.

मुंबई : पती आणि मुलांना ठार मारण्याची धमकी देत, एका बांधकाम व्यावसायिकाने गेल्या आठ वर्षांपासून बलात्कार केल्याप्रकरणीची फिर्याद, एका विवाहितेने चारकोप पोलीस ठाण्यात दिली आहे. या प्रकरणी राजेश मिश्रा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पीडित लता (नावात बदल) हिचा पती रिक्षाचालक असून दोन मुले आहेत. पती एका मंदिरात साफसफाईचे काम करीत होते. त्या वेळी लताचे त्या ठिकाणी जाणे होत असे, त्यातून २००९ मध्ये तिची मिश्राशी ओळख झाली. मुलीच्या लग्नासाठी हॉल मिळवून देतो, असे सांगत मिश्रा तिला हॉटेलमध्ये घेऊन गेला. तेथे रिव्हॉल्व्हरची भीती दाखवून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर, आकसा, नाशिक, सातारा, वाराणसी, महाबळेश्वर आदी ठिकाणी नेऊन शरीरसंबंध ठेवले, असा आरोप विवाहितेने केला आहे.कोणापुढे त्याची वाच्यता केल्यास, पती व मुलांना ठार मारण्याची धमकी बांधकाम व्यावसायिक देत होता. त्यामुळे भीतिपोटी गप्प राहिले. अखेर सर्व असह्य झाल्याने तक्रार दाखल केल्याचे तिने फिर्यादीत म्हटले आहे.

टॅग्स :गुन्हा