बजेट प्रतिक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:34 IST2021-02-05T04:34:19+5:302021-02-05T04:34:19+5:30
सरकारने या टप्प्यावर वाढीवर खर्च करण्याला प्राधान्य दिले आहे. वित्तीय तूट व्यवस्थापित करण्यास यामुळे मदत होईल. आरोग्य सेवा आणि ...

बजेट प्रतिक्रिया
सरकारने या टप्प्यावर वाढीवर खर्च करण्याला प्राधान्य दिले आहे. वित्तीय तूट व्यवस्थापित करण्यास यामुळे मदत होईल. आरोग्य सेवा आणि पायाभूत सुविधांवरील खर्चात भरीव वाढ होईल. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र आणि यासह आर्थिक वाढीस मदत होईल. रोजगार निर्माण होईल. एकूणच हा भारतातील दीर्घकालीन आर्थिक हितसंबंधित उद्दिष्टात्मक अर्थसंकल्प आहे.
- चंद्रशेखर घोष, व्यवस्थापकीय संचालक, बंधन बँक
--------------------
सरकार त्याच्या गुंतवणुकीच्या अजेंड्यावर खूप महत्त्वाकांक्षी आहे. निर्गुंतवणुकीचा अजेंडा, व्यवसाय करण्याची सुलभता, कर निर्धारण पुन्हा सुरू करण्यासाठी मुदतीत कपात, परकीय भांडवलाची आवश्यकता इत्यादी मुद्द्यावर लक्ष देतानाच अर्थव्यवस्थेचे पुनरुज्जीवन करण्यावर सरकारचे लक्ष आहे.
- उदय शंकर, अध्यक्ष, फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री
--------------------
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना चालना देणे हे महत्त्वाचे आहे. बॅंकांना त्यांची बुडीची कर्जे मुक्त करण्यास मदत करणे गरजेचे आहे. कर्जाद्वारे मालमत्तांचे चांगले मूल्य मिळविण्यासाठी काम झाले पाहिजे. विमा क्षेत्रातील थेट विदेशी गुंतवणुकीसाठी अधिक प्रयत्न गरजचे आहेत. हे एक चांगले बजेट आहे. ज्याचे लक्ष केंद्रित आत्मनिर्भरतेवर आहे. पायाभूत सुविधा, महिला सक्षमीकरण, निरोगी भारत, सुशासन, सर्वांसाठी शिक्षण, तरुणांसाठी नोकरी, सर्वसमावेशक विकास आणि सहजता याची वैशिष्ट आहेत.
- पद्मजा चुंदुरू, व्यवस्थापकीय संचालक, इंडियन बँक