अर्थसंकल्प प्रतिक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:32 IST2021-02-05T04:32:09+5:302021-02-05T04:32:09+5:30
विरार-डहाणू चौपदरीकरणाकडे आतापर्यंत दुर्लक्ष झाले आहे. येत्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात यावी. पालघर जिल्ह्यात अद्ययावत करण्यात यावा, त्यामुळे थांब्यात ...

अर्थसंकल्प प्रतिक्रिया
विरार-डहाणू चौपदरीकरणाकडे आतापर्यंत दुर्लक्ष झाले आहे. येत्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात यावी. पालघर जिल्ह्यात अद्ययावत करण्यात यावा, त्यामुळे थांब्यात वाढ होईल. तसेच थेट गाड्यांचे थांबे काढण्यात येत आहेत. हे थांबे काढू नयेत. पालघर जिल्हा आदिवासीबहुल असल्याने त्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.
नंदू पावगी, उपाध्यक्ष, मुंबई रेल प्रवासी संघ
रेल्वेला मिळणाऱ्या एकूण उत्पन्नात मुंबई विभागाचा मोठा वाटा आहे .उपनगरीय प्रवाशांकडून जमा होणारा निधी प्रवाशांना अधिक सुखकर आणि सुरक्षित प्रवास कसा काय देता येईल, यासाठी नियोजनपूर्वक वापरावा. कोरोनाकाळात चाकरमानी अडचणीत आले आहेत; त्यामुळे तिकीट किंवा पासदर वाढू नयेत. मूलभूत सुविधा, पाणी, उद्घोषणा, प्रसाधने, स्वच्छता मिळावी. दिव्यांगांना अधिक सोय व सुविधा मिळावी. मुंबई रेल्वे विकास मंडळाला अधिक स्वायत्तता मिळावी, मुंबई उपनगरीय सेवा सुधारण्यासाठी चिखलोली स्थानक लवकर पूर्ण करावे. कल्याण रेल्वे यार्डाचे रिमॉडेलिंग करून अधिक योग्य वापर व्हावा.
प्रसाद पाठक, रेल्वे प्रवासी
कर्जत-कसारा मार्गाचे चौपदरीकरण अनेक वर्षांपासून रखडले आहे. कल्याणपर्यंत दोन जलद आणि दोन धिमे मार्ग आहेत. परंतु त्यापुढे दोनच मार्ग होतात; त्यामुळे प्रवाशांची संख्या वाढते तसेच मालगाड्या आणि एक्सप्रेस गाड्यांना ते अडचणीचे ठरते. त्याचे चौपदरीकरण केले जावे.
एमआरव्हीसीचे सर्व प्रकल्प पूर्ण करण्यात यावेत. यामध्ये प्लॅटफॉर्म, लिफ्ट, नूतनीकरण, पुलाच्या कामांना गती मिळावी. या कामांसाठी आर्थिक तरतूद करण्यात यावी.
मधू कोटीयन, अध्यक्ष, मुंबई रेल्वे प्रवासी संघ
मुंबई विभागातून रेल्वेला जास्त उत्पन्न मिळते, त्या तुलनेत सोयी-सुविधांची कमरता आहे. मध्य रेल्वे मार्गावर सरकते जिने आणि लिफ्टच्या संख्येत वाढ व्हावी. पादचारी पूल आणि इतर पुलांची दुरुस्ती करण्यात यावी. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी एटीव्हीएमची संख्या वाढविण्यात यावी तसेच रेल्वेच्या तिकीट आणि पासच्या दरात कोणत्याही प्रकारची दरवाढ करू नये.
विजय जगताप, रेल्वे प्रवासी