मुंबई - मुंबई महानगरपालिकेचे आगामी काही दिवस राजकीय आणि प्रशासकीयदृष्ट्या महत्त्वाचे ठरणार आहेत. स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडीपासून ते अर्थसंकल्प आणि विशेष समित्यांच्या निवडीपर्यंतचा भरगच्च कार्यक्रम जाहीर झाला असून, पालिका वर्तुळात आतापासूनच हालचालींना वेग आला आहे.
पालिकेच्या सर्वात महत्त्वाच्या स्थायी समिती आणि शिक्षण समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक २० फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे. तत्पूर्वी, १६ फेब्रुवारीला वैधानिक समित्यांचे विषय पटलावर ठेवले जाणार आहेत. सभागृहाच्या बैठकीत हे कामकाज मार्गी लावण्याचे येईल. तसेच २३ फेब्रुवारी रोजी सुधार समिती आणि बेस्ट समिती अध्यक्षांची निवड होईल. तर २४ फेब्रुवारीला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांना श्रद्धांजली आणि दुखवटा प्रस्ताव मांडण्यात येईल. हा दिवस शोकप्रस्तावासाठी राखून ठेवण्यात आला आहे. तर २५ फेब्रुवारीला दुपारी ३ वाजता वृक्ष प्राधिकरणाची बैठक पार पडणार आहे. स्वीकृत सदस्यही याच दिवशी घोषित होतील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
२५ फेब्रुवारीला बजेटमहानगरपालिकेचा या वर्षाचा अर्थसंकल्प २५ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता सादर केला जाईल. मात्र, अर्थसंकल्प मांडल्यानंतर लगेचच सभा तहकूब करण्यात येणार असल्याने त्या दिवशी कोणतीही चर्चा होणार नाही, असे सूत्रांनी सांगितले.
के दक्षिण आणि पूर्व प्रभाग मिळून एकच प्रभागप्रशासकीय सोयीसाठी पालिकेने एक मोठा निर्णय घेतला असून, आता ‘के दक्षिण’ आणि ‘के पूर्व’ हे दोन्ही प्रभाग मिळून एकच प्रभाग म्हणून कार्य करणार आहेत. यासंदर्भात शिंदेसेनेचे आमदार मुरजी पटेल यांनी प्रशासनाला तशी सूचना केली होती, असे समजते.
Web Summary : Mumbai's BMC gears up for crucial political and administrative events. Key committee elections are scheduled, culminating in the budget presentation on February 25th. 'K South' and 'K East' wards will merge for administrative efficiency.
Web Summary : मुंबई बीएमसी महत्वपूर्ण राजनीतिक और प्रशासनिक घटनाओं के लिए तैयार है। प्रमुख समिति चुनाव निर्धारित हैं, जिसका समापन 25 फरवरी को बजट प्रस्तुति के साथ होगा। प्रशासनिक दक्षता के लिए 'के साउथ' और 'के ईस्ट' वार्डों का विलय किया जाएगा।