बीएसएनएलची सेवा कोलमडली

By Admin | Updated: October 21, 2014 00:03 IST2014-10-21T00:03:52+5:302014-10-21T00:03:52+5:30

दिवाळी तोंडावर आली. दूरसंचार खात्याकडे खेटे मारुन ग्राहक हतबल झाले, तरीही मुरुड कार्यालयाकडून गेले २० दिवसांपासून बंद दूरध्वनी सेवा सुरु न झाल्यामुळे ग्राहकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

BSNL service collapses | बीएसएनएलची सेवा कोलमडली

बीएसएनएलची सेवा कोलमडली

मुरुड : दिवाळी तोंडावर आली. दूरसंचार खात्याकडे खेटे मारुन ग्राहक हतबल झाले, तरीही मुरुड कार्यालयाकडून गेले २० दिवसांपासून बंद दूरध्वनी सेवा सुरु न झाल्यामुळे ग्राहकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मुरुड शहरात ८५० दूरध्वनी ग्राहक असून सुमारे १५० ब्रॉडबँड कनेक्शन आहेत. दूरध्वनी कधी सुरु होतील? असे कनिष्ठ अभियंता रुपेश पाटील यांना विचारले असता एक्सजेंचमधील पाचही मोडूल्स जळाले असून खात्याकडून वेळेवर दुरुस्तीसाठी तांत्रिक साहित्य व तंत्रज्ञ मिळत नसल्याचा खुलासा पाटील यांनी केला. टेक्ननिकल आॅपरेशनची संपूर्ण जबाबदारी अ‍ॅस्पायर्स इलिक्ट्रक्लद्वारका नासिक या आऊट सोर्सिंग कंपनीकडे असल्याचे समजते. एकूण १८०० लँडलाईन कनेक्शन, तर १५० च्या जवळपास ब्रॉडबँड सेवा उपलब्ध आहेत. तक्रार निवारणासाठी कोणी कार्यालयात गेले तर टाळे लावल्यातच जमा अशी परिस्थिती मुरुडकर गेल्या वर्षभरापासून सहन करीत आहेत.
इंटरनेट सेवा बँका, पतसंख्या, लॉजिंग, बोर्डिंग, शासकीय कार्यालये, रुग्णालय आदींना अनिवार्य झाली आहे. बँक आॅफ इंडियाचे नेट तर दिवसागणिक बंद पडते. बऱ्याचदा एटीएम सेवाही ठप्प होेते. अर्ध्या मुरुड शहरात बीएसएनएलची मोबाइल सेवा जवळपास नसतेच.
दत्त मंदिरावरील टॉवर फक्त कार्यरत आहे. परिणामी ही सेवा नॉट रिचेबल असते. दूरध्वनी बंद असले तरी बिले मात्र वेळेवर दिली जातात. बऱ्याचदा बिले भरुन देखील सेवा खंडित केली जाते. एकूणच दूरसंचार निगमची सेवा हा चर्चेचा विषय आहे. (वार्ताहर)

Web Title: BSNL service collapses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.