बीएसएनएल कर्मचाऱ्यांमध्ये स्वेच्छानिवृत्तीवरुन नाराजी; ऑगस्टचे थकीत वेतन लवकर देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 02:10 AM2019-09-11T02:10:18+5:302019-09-11T02:10:25+5:30

पुनरुज्जीवन प्रस्तावाच्या नावावर कर्मचाºयांची कपात करण्याचे धोरण सरकार राबविण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे कर्मचाºयांचा त्यांना विरोध आहे.

 BSNL employees reluctant to volunteer; Demand for early pay of August dues | बीएसएनएल कर्मचाऱ्यांमध्ये स्वेच्छानिवृत्तीवरुन नाराजी; ऑगस्टचे थकीत वेतन लवकर देण्याची मागणी

बीएसएनएल कर्मचाऱ्यांमध्ये स्वेच्छानिवृत्तीवरुन नाराजी; ऑगस्टचे थकीत वेतन लवकर देण्याची मागणी

googlenewsNext

मुंबई : एमटीएनएल व बीएसएनएलचे पुनरुज्जीवन करण्यासाठी प्रस्तावित असलेल्या योजनेत कर्मचाऱ्यांच्या स्वेच्छानिवृत्तीचा मोठा हिस्सा असणार आहे. या योजनेबाबत कर्मचाºयांमध्ये मोठी नाराजी व्यक्त केली जात आहे.

पुनरुज्जीवन प्रस्तावाच्या नावावर कर्मचाºयांची कपात करण्याचे धोरण सरकार राबविण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे कर्मचाºयांचा त्यांना विरोध आहे. स्वेच्छानिवृत्ती योजना राबविण्यापूर्वी वेतन पुनर्रचना करण्याची मागणी करण्यात येत आहे. याबाबत बीएसएनएल एम्प्लॉईज युनियनची बुधवारी कल्याणमध्ये बैठक होणार असून, त्यामध्ये याबाबत अधिक चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे गणेश हिंगे यांनी दिली. एकीकडे निधी नसल्याने बीएसएनएलच्या कर्मचाºयांचे वेतन रखडलेले असताना दुसरीकडे स्वेच्छानिवृत्ती घेणाºया कर्मचाºयांना त्यापोटी द्यावे लागणारे हजारो कोटी रुपये कुठून आणण्यात येणार आहेत, असा कर्मचाºयांचा प्रश्न आहे. सुमारे ७ हजार कोटींचा निधी यासाठी लागणार आहे. तो कसा मिळणार, हा प्रश्न आहे. तिसºया पीआरसीप्रमाणे वेतन व इतर अनुषंगिक लाभ मिळणे गरजेचे आहे; अन्यथा विरोध तीव्र होईल, असा कर्मचाºयांचा सूर आहे. बीएसएनएलचे आॅगस्ट महिन्याचे वेतन अद्याप झालेले नाही; मात्र हे वेतन २० सप्टेंबरच्या सुमारास होण्याची शक्यता अधिकाºयांनी वर्तवली आहे. एमटीएनएलचे जुलै महिन्याचे व आॅगस्ट महिन्याचे वेतन प्रलंबित आहे. त्यापैकी जुलैचे वेतन १२ सप्टेंबर रोजी होईल. त्याबाबतचे निर्देश दिल्याची माहिती अधिकाºयांनी दिली.

Web Title:  BSNL employees reluctant to volunteer; Demand for early pay of August dues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.