मेट्रोच्या दिमतीला ‘बीआरटीएस’

By Admin | Updated: November 26, 2014 22:52 IST2014-11-26T22:52:57+5:302014-11-26T22:52:57+5:30

एकीकडे ठाण्यासाठी नुकतीच मेट्रोला मंजुरी मिळाली असतांना, या मेट्रोला शहरातील इतरही मार्ग जोडण्याचा विचार पालिकेने सुरु केला आहे.

'BRTS' for Metro | मेट्रोच्या दिमतीला ‘बीआरटीएस’

मेट्रोच्या दिमतीला ‘बीआरटीएस’

ठाणो : एकीकडे ठाण्यासाठी नुकतीच मेट्रोला मंजुरी मिळाली असतांना, या मेट्रोला शहरातील इतरही मार्ग जोडण्याचा विचार पालिकेने सुरु केला आहे. त्यामुळे बासनात गुंडाळलेला बीआरटीएसचा प्रस्ताव पुन्हा पुढे आणला आहे. या योजनेची कशा पध्दतीने अंमलबजावणी करया येऊ शकते याचा अभ्यास आता पालिकेने नव्याने सुरु केला आहे. 
अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अखेर ठाण्यात लवकरच मेट्रो सुरु  होणार आहे. घाटकोपर पासून मेट्रो सुरु  झाल्यानंतर मेट्रोचे ठाण्यातील पहिले स्टेशन तीन हात नाका जंक्शन असेल. त्यानंतर  प्रादेशिक परिवहन कार्यालय, नितीन जंक्शन, कॅडबरी आणि गोल्डन डाइज ( माजिवडा ) अशी इस्टर्न एक्सप्रेस हायवे वरून मेट्रो समांतर धावणार आहे.  घोडबंदर रोड सुरु झाल्यानंतर मानपाडा पर्यंत मेट्रो भूमिगत धावणार असून ओवळा येथील जागा कारशेडसाठी प्रस्तावित करण्यात येणार आहे. ही सर्व स्टेशन हायवेला लागून असल्याने मेट्रोला शहरातील अंतर्गत मार्गांशी जोडणो महत्वाचे असून यासाठी समांतर बससेवा रिंगरुट पद्धतीने कशाप्रकारे सुरु  करता येईल यांसदर्भात प्राथमिक स्तरावर अभ्यास सुरु  आहे. यासाठी घोडबंदर रोडवर बीआरटीएस ही जुनी योजना सुरु  करण्याचा पालिकेचा विचार आहे. 
ठाण्यात एकदा मेट्रो सुरु  झाल्यानंतर ठाणोकर सर्वाधिक मेट्रोमधून प्रवास करणार हे अपेक्षीत आहे. मेट्रोची सर्व स्टेशन ही हायवेवर असल्याने नागरिकांना या स्टेशनपर्यंत जाण्यासाठी बस सहज उपलब्ध होण्याच्या दृष्टीकोनातून यापूर्वीच प्रस्तावित असलेली जुनी रिंगरुट योजना महत्वाची भूमिका बजावणार आहे. हायवेला आणि मेट्रोला जोडण्यासाठी ठाणो स्टेशन ते तीन हात नाका, त्यानंतर नितीन जंक्शन, पाचपाखाडी होऊन पुन्हा ठाणो स्टेशन असा मार्ग, त्यानंतर दुसरा मार्ग मुलुंड चेकनाका ते तीन हात नाका, नितीन जंक्शन, त्यानंतर डाव्या बाजूने वळवून वागळे इस्टेटमधून रामचंद्र नगर, इंदिरा नगर होऊन पुन्हा मुलुंड चेकनाका असा मार्ग असू शकतो. त्यामुळे मेट्रोने प्रवास करणा:या प्रवाशांना हायवे तसेच मेट्रो स्टेशनपर्यंत सहज जाता येणार आहे. बीआरटीएसचा अभ्यास यापूर्वीच पालिकेने केलेला आहे. परंतु आता मेट्रोचे स्टेशनही अंतिम झाल्याने त्या - त्या स्टेशनला आणि तेथील नागरीकांना या स्टेशनर्पयत पोहचण्यासाठी बीआरटीएसची 
सेवा उपयोगी ठरणार आहे.  
(प्रतिनिधी)

 

Web Title: 'BRTS' for Metro

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.