भाईपाडा अंगणवाडी इमारतीची दुरवस्था
By Admin | Updated: August 14, 2014 00:51 IST2014-08-14T00:51:11+5:302014-08-14T00:51:11+5:30
चिखले गावातील भाईपाडा या आदिवासी पाड्यावर अंगणवाडी इमारतीची दुरवस्था झाली आहे

भाईपाडा अंगणवाडी इमारतीची दुरवस्था
बोर्डी : चिखले गावातील भाईपाडा या आदिवासी पाड्यावर अंगणवाडी इमारतीची दुरवस्था झाली आहे. ३ ते ६ वयोगटातील बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षणाचे धडे प्राथमिक शाळेच्या ओटीवर, वाऱ्या पावसात उघड्यावर बसून घ्यावे लागतात. असुरक्षित वातावरणात बाल शिक्षण कसे साधणार? हा सवाल पाड्यावरील पालकांना मांडला आहे.
चिखले गावातील भाईपाडा या आदिवासी पाड्यावर अंगणवाडी इमारतीची दुरवस्था झाली आहे. भिंतीला भेगा पडल्या असून खिडक्यांची पडझड झाली आहे. गळके छत, सिमेंट पत्र्यांचा भार पेलणारी लोखडी कैची गंजली आहे. शौचालयाचा दरवाजा नादुरुस्त आहे. आवारात चिखलाचे साम्राज्य असून इमारत वापरण्यास अयोग्य आहे. सुरक्षेकरिता नजीकच्या प्राथमिक शाळेच्या ओटीवर पंच्चावन आदिवासी बालकांना वाऱ्या पावसात उघड्यावर बसवून शिक्षणाचे धडे गिरवण्यात येत आहेत. निष्पाप बालके धोक्यापासून अपरिचित आहेत. नऊ ते एक या वेळेत बडबड गीते, गाणी, खेळ, नाश्ता, आहार आनंदात आवडीने करतात. (वार्ताहर)