ब्रिटिश नागरिकांचा दारूच्या नशेत कुलाब्यातील ताजबाहेर धिंगाणा

By Admin | Updated: August 18, 2016 05:07 IST2016-08-18T05:07:45+5:302016-08-18T05:07:45+5:30

दारूच्या नशेत धिंगाणा घालणाऱ्या तीन ब्रिटनच्या नागरिकांवर कुलाबा पोलिसांनी रविवारी रात्री कारवाई केली. दोन तरुणांच्या सतर्कतेमुळे ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आली होती.

British citizens drunk out of liquor in drug addicts | ब्रिटिश नागरिकांचा दारूच्या नशेत कुलाब्यातील ताजबाहेर धिंगाणा

ब्रिटिश नागरिकांचा दारूच्या नशेत कुलाब्यातील ताजबाहेर धिंगाणा

मुंबई : दारूच्या नशेत धिंगाणा घालणाऱ्या तीन ब्रिटनच्या नागरिकांवर कुलाबा पोलिसांनी रविवारी रात्री कारवाई केली. दोन तरुणांच्या सतर्कतेमुळे ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आली होती.
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला ताज हॉटेलबाहेर तीन ब्रिटन नागरिक गोंधळ घालत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. परदेशी नागरिक दुखावू नये म्हणून पोलीस नरमाईची भूमिका घेत त्यांना समजावत होते. मात्र पोलिसांनी हटकल्याने परदेशी नागरिकांनी पोलिसांनाच शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी तिथे उपस्थित मनोज गुंड आणि सागर सातपुते हे परळवासीय पोलिसांच्या मदतीस धावून आले. या दोन्हीही तरुणांनी त्यांना चांगलेच खडेबोल सुनविले. त्यांना त्यांची चूक दाखवून दिली.
याप्रकरणी सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन करून धिंगाणा केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती कुलाबा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक धोपावकर यांनी दिली.

Web Title: British citizens drunk out of liquor in drug addicts