Join us

करी रोडवरील ब्रिटिशकालीन पूल किंचित कलला; मध्यरेल्वे विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2019 12:13 IST

मस्जिद बंदर ते करीरोड स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगण्यात येत आहे.

मुंबई : करी रोडवरील ब्रिटिशकालीन पूल एका बाजुला किंचित कलल्याने मध्य रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. सीएसएमटीकडे जाणारी लोकल वाहतूक स्लो ट्रॅकवर वळविण्यात आली आहे. पूलामुळे ओव्हहेड वायर खाली आली आहे. यामुळे तेथून लोकल जाऊ शकत नाही.

मस्जिद बंदर ते करीरोड स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, लोकमतला मिळालेल्या माहितीनुसार करी रोड स्थानकावरील ब्रिटिशकालीन जुना पूल एका बाजुला काहीसा कलला आहे. यामुळे काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती. जलद मार्गावरील वाहतूक धीम्या मार्गावर वळविण्यात आली आहे. 

 

मस्जिद बंदर ते करीरोड स्थानकादरम्यान एक्स्प्रेस आणि जलद मार्गावरील लोकल थांबवून ठेवण्यात आल्या आहेत. 

टॅग्स :मध्य रेल्वेलोकल