कामवारी नदीवरील चावे पूल खचला
By Admin | Updated: May 12, 2014 23:04 IST2014-05-12T21:35:03+5:302014-05-12T23:04:43+5:30
भिवंडी तालुक्यातील नांदिठणे (महापौली) कामवारी नदीवर असलेला चाव्याचा पुल एका बाजूने खालून पूर्णपणे खचला आहे. त्यामुळे तो कधी कोसळेल याचा भरवसा नाही.

कामवारी नदीवरील चावे पूल खचला
लोनाड : भिवंडी तालुक्यातील नांदिठणे (महापौली) कामवारी नदीवर असलेला चाव्याचा पुल एका बाजूने खालून पूर्णपणे खचला आहे. त्यामुळे तो कधी कोसळेल याचा भरवसा नाही. प्रवास करताना पुलाचा भाग कंप पावत असल्याने प्रवास करणे धोक्याचे झाले आहे.
भिवंडी, अनगाव, अंबाडी, पडघा या ठिकाणी जाण्या-येण्याकरीता याच पुलाचा वापर होत असून या पुलावरून चावे, भरे, वडाचा पाडा, आवलोटे, मोहाचापाडा, शेलारपाडा, लाप, कुंभार लाब, सुकाळेपाडा, मुर्हे, खालींग, कुरुंद, नांदिठणे, महापोली आदी गाव पाड्यातील ग्रामस्थ या पुलावरून प्रवास करीत असतात.
चावे पूल कोसळल्यास खाजगी वाहनांसह एस.टी. सेवाही बंद होईल. परिणामी शाळकरी, कॉलेज विद्यार्थी, नोकरदार वर्ग, भाजीपाला विकणारे शेतकरी यांच्यासह कामधंदेवाईकांचे अतोनात नुकसान होईल.
(नरेश पाटील)