अपघातात नववधूचा मृत्यू
By Admin | Updated: February 11, 2015 22:49 IST2015-02-11T22:49:39+5:302015-02-11T22:49:39+5:30
तलासरीजवळ महामार्गावरील वॅगन आर गाडीला झालेल्या अपघातात नववधूचा जागीच मृत्यू झाला तर गाडीतील इतर चारजण गंभीर जखमी झाले.

अपघातात नववधूचा मृत्यू
तलासरी : तलासरीजवळ महामार्गावरील वॅगन आर गाडीला झालेल्या अपघातात नववधूचा जागीच मृत्यू झाला तर गाडीतील इतर चारजण गंभीर जखमी झाले.
तलासरीतील मदन वर्मा यांचा मुलगा पवन यांचे रविवारी लग्न झाले. लग्नानंतर महालक्ष्मीच्या दर्शनासाठी घरातील नातेवाईकांसह नववधू सानिका, पवन हे वॅगन आर गाडीतून जात असताना दापचरी येथे गाडीला अपघात झाला. सानिका पवन वर्मा (२१) रा. तलासरी हीचा जागीच मृत्यू झाला. तर सुनिता प्रमोद वर्मा (३९), आनंद मदन वर्मा (१९), नितल प्रमोद वर्मा (१७), अमित गणेश खोडका (२०) हे गंभीर जखमी झाले. जखमींना वापी येथील हरिया रूग्णालयात दाखल करण्यात आले.
(वार्ताहर)