लाचखोर पोलीस अटकेत

By Admin | Updated: August 22, 2015 01:21 IST2015-08-22T01:21:53+5:302015-08-22T01:21:53+5:30

मालवणी पोलीस ठाण्यातील लाचखोर पोलीस शिपायाला मुंबई लाचलुचपत प्रतिबंध विभाग (एसीबी) ने पाच हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली

Bribery police arrest | लाचखोर पोलीस अटकेत

लाचखोर पोलीस अटकेत

मुंबई : मालवणी पोलीस ठाण्यातील लाचखोर पोलीस शिपायाला मुंबई लाचलुचपत प्रतिबंध विभाग (एसीबी) ने पाच हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली. हेमराज बामने (४५) असे अटक करण्यात आलेल्या पोलिसाचे नाव आहे. तो हेड कॉन्स्टेबल म्हणून मालवणी पोलीस ठाण्यात कार्यरत होता. मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मिलिंद खेतले यांनी लोकमतला दिलेल्या माहितीनुसार, मालवणीतील एका इसमाच्या घराचे बांधकाम सुरू होते. त्यासाठी बामनेने या इसमाकडे १५ हजारांची लाच मागितली होती. या प्रकरणी संबंधित इसमाने एसीबीकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार एसीबीने सापळा रचून बामनेला पाच हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली. (प्रतिनिधी)

Web Title: Bribery police arrest