लाचखोर पालिका अधिकाऱ्याला अटक
By Admin | Updated: May 7, 2015 02:50 IST2015-05-07T02:50:44+5:302015-05-07T02:50:44+5:30
एका सामाजिक संस्थेकडून ६ हजारांची लाच मागणाऱ्या पालिकेच्या एका अधिकाऱ्याला बुधवारी लाच लुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी अटक केली.

लाचखोर पालिका अधिकाऱ्याला अटक
मुंबई : एका सामाजिक संस्थेकडून ६ हजारांची लाच मागणाऱ्या पालिकेच्या एका अधिकाऱ्याला बुधवारी लाच लुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. नारायण पवार असे या अधिकाऱ्याचे नाव असून तो महापालिकेच्या एम पूर्व कार्यालयात कार्यरत होता.
गोवंडी परिसरात राहणारे तक्रारदार यांची याच परिसरात एका सामाजिक संस्था असून त्यांना पालिकेकडून कचरा उचलण्याचे कंत्राट मिळाले आहे. याच कामाचे काही बिल वर्षभरापासून पालिकेकडे अनेक दिवसांपासून बाकी होते. याबाबत संस्थेच्या एका पदाधिकाऱ्याने एम पूर्व कार्यालयात जाऊन घनकचरा व्यवस्थापन खात्यामध्ये काम करणारे नारायण पवार याची भेट घेतली. यावर पवार याने हे बिल मंजूर करण्यासाठी लाच मागितली. याबाबतच्या तक्रारीनुसार लाच लुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून पवारला लाच घेताना रंगेहाथ अटक केली. (प्रतिनिधी)