डेब्रिज वाहतूकदाराकडे लाच: लिपिक अटकेत

By Admin | Updated: November 13, 2014 23:03 IST2014-11-13T23:03:48+5:302014-11-13T23:03:48+5:30

डेब्रिज वाहतूक करणा:या डम्परवर भरारी पथकाची कारवाई टाळण्यासाठी लाच मागणा:या दोघांना अटक करण्यात आली आहे.

Bribe to Debrire Traffic: Clerk detained | डेब्रिज वाहतूकदाराकडे लाच: लिपिक अटकेत

डेब्रिज वाहतूकदाराकडे लाच: लिपिक अटकेत

नवी मुंबई : डेब्रिज वाहतूक करणा:या डम्परवर भरारी पथकाची कारवाई टाळण्यासाठी लाच मागणा:या दोघांना अटक करण्यात आली आहे. महापालिका भरारी पथकाच्या लिपिकासह एका खाजगी इसमाचा त्यात समावेश आहे. डेब्रिज वाहतूक करणा:या व्यावसायिकाकडे त्याने 1क् हजार रुपयांची लाच मागितली होती.
महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी भरारी पथकामध्ये लिपिकाचे काम करणा:या विजय पाटील (शेंदाणो) व खाजगी इसम फैजल हक या दोघांना अटक करण्यात आली आहे. पाटील हा पालिकेचाच कर्मचारी असल्याने त्याला डेब्रिज वाहतूक करणा:या व्यावसायिकांची माहिती होती. त्यानुसार डम्परद्वारे डेब्रिजची वाहतूक करणा:या एका व्यावसायिकाकडे त्याने 1क् हजारांची लाच मागितली होती. सदर व्यक्तीकडे 1क् डम्पर असल्याने त्यावर भरारी पथकाची कारवाई टाळण्यासाठी त्याने ही लाच मागितली होती. त्यामुळे सदर डेब्रिज वाहतूकदाराने नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे यासंदर्भातची तक्रार केली होती. त्यानुसार गुरुवारी दुपारी कोपरी पुलाजवळ सापळा रचण्यात आला होता. यावेळी तक्रारदाराकडून फैजल हक या खाजगी इसमाने ही रक्कम स्वीकारली. त्यानंतर पाटील हा त्याच्याकडून लाचेची रक्कम स्वत:कडे घेत असताना दोघांवर कारवाई करण्यात आली.
पाटील याने यापूर्वी महापालिकेच्याच अधिका:यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यानुसार काही अधिका:यांविरोधात मुंडन आंदोलनही केलेले आहे. मात्र इतर अधिका:यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणारा पाटील हाच लाचखोर असल्याचे या प्रकारावरून स्पष्ट झाले आहे.(प्रतिनिधी)

 

Web Title: Bribe to Debrire Traffic: Clerk detained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.