डेंग्यूच्या डासांची 3,948 ठिकाणी पैदास

By Admin | Updated: November 9, 2014 01:37 IST2014-11-09T01:37:56+5:302014-11-09T01:37:56+5:30

ऑक्टोबर महिन्यात डेंग्यूचे 213 रुग्ण आढळून आल्यानंतर महापालिका डेंग्यूच्या डासांची पैदास होणारी ठिकाणो शोधून काढण्यात व्यग्र आहे.

Breeding of dengue mosquitoes in 3,948 places | डेंग्यूच्या डासांची 3,948 ठिकाणी पैदास

डेंग्यूच्या डासांची 3,948 ठिकाणी पैदास

पूजा दामले - मुंबई
ऑक्टोबर महिन्यात डेंग्यूचे 213 रुग्ण आढळून आल्यानंतर महापालिका डेंग्यूच्या डासांची पैदास होणारी ठिकाणो शोधून काढण्यात व्यग्र आहे. जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत मुंबईत 1क् वॉर्डमध्ये मिळून 3 हजार 948 ठिकाणी डासांची पैदास झाल्याचे आढळून आले. तर ऑक्टोबर महिन्यात झोपडपट्टी भागात 1क्क् ठिकाणी आणि झोपडपट्टी नसलेल्या भागात 1 हजार 8क् ठिकाणी डेंग्यूच्या डासांची पैदास झाल्याचे आढळून आल्याचे कीटकनाशक विभागाचे अधिकारी राजेंद्र नारिंग्रेकर यांनी सांगितले.
डेंग्यूच्या डासांची पैदास ही स्वच्छ साठलेल्या पाण्यात होते. पावसाळा सुरू असताना घराच्या आजूबाजूला, छपरावर, मैदानांमध्ये साठणा:या पाण्यामध्ये डेंग्यूच्या डासांची पैदास होताना आढळत होती. मात्र, पावसाळा संपल्यावर घरांमध्ये साठलेल्या पाण्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होताना आढळते आहे. यामध्येही उच्चभ्रू वस्त्या, झोपडपट्टी नसलेल्या भागांमध्ये डेंग्यूचे डास जास्त प्रमाणात आढळत आहेत. कारण अशा  ठिकाणांच्या घरांमध्ये फेंगशुई प्लांट, शोभेची झाडे, एसीचे पाणी, डिफ्रॉस्ट ट्रे, झाडाखालची पेट्री डिश या ठिकाणी पाणी साचून राहते. 
शहरामध्ये गेल्या दहा महिन्यांपासून महापालिकेचे कर्मचारी डेंग्यूच्या डासांची पैदास होणारी ठिकाणो शोधून काढत आहेत. 1क् महिन्यांमध्ये भायखळा विभागात सर्वाधिक ठिकाणी म्हणजे 1179 डेंग्यूच्या डासांची पैदास झाल्याचे आढळून आले आहे. यानंतर चेंबूर भागात 397, अंधेरी-जोगेश्वरी भागात 385, सांताक्रुझ-खार विभागात 378 आणि एल्फिन्स्टन-परळ भागामध्ये 371 ठिकाणी डासांची पैदास झाल्याचे आढळून आले आहे. 
 
पाणी प्या, विश्रंती घ्या : डेंग्यू झालेल्या रुग्णांची प्रकृती 
स्थिर असतानाच अचानक प्लेटलेट्स कमी होतात. कमी झालेल्या प्लेटलेट्समुळे डेंग्यू रुग्णाची प्रकृती अत्यवस्थ होते. हे टाळण्यासाठी 2 ते 3 लीटर पाणी पिणो गरजेचे आहे. याचबरोबरीने रुग्णाने विश्रंती घेतली पाहिजे. रोज 2 ते 3 लीटर पाणी पिऊन, विश्रंती घेतल्यास रुग्णाची प्रकृती स्थिर राहण्यास मदत होते.   
 
च्महापालिकेचे एकूण 9क्क् कर्मचारी हे डेंग्यू, मलेरिया रोखण्यासाठी कार्यरत आहेत. प्रत्येक कर्मचारी दिवसाला 45 ते 5क् घरांची पाहणी करतो. दर महिन्याला 7 लाख घरांची पाहणी केली जाते. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांमध्ये एकूण 9 ते 1क् लाख घरांची पाहणी करण्यात आली आहे. 

 

Web Title: Breeding of dengue mosquitoes in 3,948 places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.