नव्या अटींचा भंग जमिनी परत घेणार
By Admin | Updated: December 15, 2014 22:50 IST2014-12-15T22:50:19+5:302014-12-15T22:50:19+5:30
अटी व शर्तींचा भंग झाल्यामुळे या जमिनी काढून घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याप्रकरणी वसईच्या तहसीलदारांनी वसई-विरार उपप्रदेशातील अशा जमीनधारकांवर नोटिसा

नव्या अटींचा भंग जमिनी परत घेणार
वसई : अटी व शर्तींचा भंग झाल्यामुळे या जमिनी काढून घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याप्रकरणी वसईच्या तहसीलदारांनी वसई-विरार उपप्रदेशातील अशा जमीनधारकांवर नोटिसा बजावल्या आहेत. ज्या वापराकरिता या जमिनी देण्यात आल्या होत्या, तो उद्देशच बाजूला राहिल्याने ही कारवाई करण्यात येत असल्याचे महसूल प्रशासनाकडून सांगण्यात आले.
वसई-विरार उपप्रदेशात अनेक शेतकऱ्यांना विविध कामांसाठी शासकीय जमिनी अटी व शर्तींचे बंधन राखून देण्यात आल्या होत्या. परंतु, या अटी व शर्तींचा भंग करून अनेकांनी या जमिनींचा वापर इतर कामांसाठी केला. यासंदर्भात अनेक तक्रारी आल्यानंतर शासनाने या जमिनी पुन्हा ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार वसई-विरार भागातील ३३ जमीनधारकांना नोटिसा बजावल्या आहेत.
अर्नाळा व अन्य भागात अशा जमिनींवर काहींनी रिसॉर्ट्स तर अनेकांनी आपली कार्यालये थाटली आहेत. वर्षापूर्वी महसूल विभागाने अशा जमिनींवरील बांधकाम काढून टाकले होते. परंतु, त्यानंतरही अशी बांधकामे होत राहिल्यामुळे शासनाने आता या जमिनीच ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात एका शेतकऱ्याने वसईच्या प्रांताधिकाऱ्यांकडे दाद मागितली, परंतु प्रांताधिकाऱ्यांनी सदर शेतकऱ्याचा अर्ज नुकताच फेटाळला. (प्रतिनिधी)