Join us
Daily Top 2Weekly Top 5

BREAKING: लोअर परळमध्ये रहिवासी इमारतीला भीषण आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2023 13:04 IST

लोअर परळ येथील रहिवासी इमारतीला भीषण आग लागली आहे.

मुंबई-

लोअर परळ येथील रहिवासी इमारतीला भीषण आग लागली आहे. लोअर परळच्या कस्तूरबा गांधी रोड येथील शिवतेज नावाच्या रहिवासी इमारतीला ही आग लागली आहे. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये आगीचा भडका उडाला आहे. यात संपूर्ण फ्लॅट जळून खाक झाला आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 

आगीचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. पण आग लागल्याच्या घटनेनंतर तातडीनं संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आली आहे. यामुळे जीवीतहानी टळली आहे. सदर परिसर दाटीवाटीचा असून आजूबाजूला रहिवासी इमारती आहेत. आगीच्या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.

टॅग्स :मुंबई