गौरी टेंबकर - कलगुटकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : प्रियकराने दुसऱ्या तरुणीच्या केसांचे कौतुक केल्याचा राग मनात धरून प्रेयसीने थेट त्या तरुणीच्या घरी मैत्रिणीसह घुसून तिचे केस कापले. तसेच 'हेअर, नो हेअर' म्हणत या घटनेचे मोबाईलमध्ये व्हिडीओ चित्रीकरणही करण्यात आले असून ते व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली होती.
केस कापण्यात आलेली २० वर्षीय तरुणीने वर्सोवा पोलिसांकडे धाव घेतल्यानंतर त्यांनी केस कापणाऱ्या २१ वर्षीय तरुणीसह तिला मदत करणाऱ्या तीन तरुणींवर २६ मार्च रोजी गुन्हा दाखल केला आहे. प्रियकराने मैत्रिणीच्या केसांची स्तुती केल्याने रागाच्या भरात तिचे केस कापून टाकण्याचा हा विरळाच प्रकार घडल्याने तो चर्चेचा विषय झाला आहे.
काही काळापूर्वी पीडितेची ओळख आरोपी व तिच्या मित्राशी झाली होती. ते दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत. मात्र या तरुणीचा मित्र इन्स्टाग्रामवरून पीडितेशी संवाद साधत होता. या संवादात त्याने पीडितेच्या केसांचे कौतुक आपल्या प्रेयसीपुढे केले. मी तुझ्या मैत्रिणीला भेटायला जाणार आहे, असे मित्राने सांगितल्याने त्याच्या प्रेयसीच्या मनात संशय निर्माण झाला व ती चिडली. ती ७मार्च रोजी पिडीतेच्या घरी गेली आणि तिचा मोबाईल तपासला. पण त्यावेळी तिला काहीही आक्षेपार्ह आढळले नव्हते.
'हेअर नो, हेअर' म्हणत व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी
आरोपी तरुणी २५ मार्च २०२६ रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास तिच्या दोन मैत्रिणींसह पीडितेच्या वर्सोवा येथील घरी गेली. या तरुणीने बेल वाजवल्या नंतर पीडितेने आईस्क्रीम डिलिव्हरी आली असावी, असे वाटल्याने दरवाजा उघडला. तेव्हा आरोपी तरुणीने तिला बाहेर ओढून तिचे केस कापण्यास सुरुवात केली. यावेळी तिच्या बरोबर आलेल्या मैत्रिणींनी मोबाइलवर या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ रेकॉर्ड केला.
केस कापल्यानंतर आरोपीने 'हेअर नो हेअर' असे म्हणत व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच काही केस सोबत घेऊन ती तेथून निघून गेली. या घटनेदरम्यान पीडितेने आरडाओरडा केला होता. आरोपी व तिच्या दोन मैत्रिणींनी इमारतीत अनधिकृतपणे प्रवेश करून हा प्रकार केला आहे.
प्रियकर यांच्यात संबंध असल्याच्या व संशयातून हा हल्ला करण्यात आल्याचे पोलिसांकडे नोंदविण्यात आलेल्या तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी वर्सोवा पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
Web Summary : Enraged by her boyfriend complimenting another girl's hair, a woman forcibly cut the girl's hair, filmed it, and threatened to release the video. Versova police have registered a case against the attacker and accomplices.
Web Summary : बॉयफ्रेंड द्वारा दूसरी लड़की के बालों की तारीफ करने से गुस्सा होकर, एक महिला ने जबरदस्ती लड़की के बाल काट दिए, वीडियो बनाया और वीडियो जारी करने की धमकी दी। वर्सोवा पुलिस ने हमलावर और साथियों के खिलाफ मामला दर्ज किया।