Join us  

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे 21 फेब्रुवारीपासून 'पेपर तापसणीवर बहिष्कार' आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2018 1:31 PM

विद्यार्थी हितासाठी व शिक्षण मंत्र्यांच्या आवाहनास प्रतिसाद देऊन संघटनेने 3 फेब्रुवारीला 'बहिष्कार' आंदोलन तात्पुरते स्थगित केले होते.

मुंबई -  विद्यार्थी हितासाठी व शिक्षण मंत्र्यांच्या आवाहनास प्रतिसाद देऊन संघटनेने 3 फेब्रुवारीला 'बहिष्कार' आंदोलन तात्पुरते स्थगित केले होते. शिक्षणमंत्र्यांनी 15 दिवसांत मागण्याची अंमलबजावणी करण्याचे संघटनेस लिहून दिले होते, त्यावेळी लिखित आश्वासनाची पूर्तता 15 दिवसांत न केल्यास 21 फेब्रुवारीपासूनच्या लेखी परीक्षेच्या पेपर तपासणी वर 'बहिष्काराचा' लेखी इशारा संघटनेने शासनास दिला होता.

परंतु गेल्या दहा दिवसांत शासनाने मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी एकही आदेश काढला नाही म्हणून महासंघाच्या 13 फेब्रुवारी रोजी झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत 20 तारखेपर्यंत शासनाने आश्वासनांची पूर्तता न केल्यास 21  फेब्रुवारीपासून 'पेपर तापसणीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला व तसे पत्र शासनास देण्यात आले आहे. परीक्षा सुरळीत होतील,विद्यार्थ्यांनी परीक्षेचा कोणताही ताण न घेता चांगला अभ्यास करून परीक्षेला जावे, असे महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे अध्यक्ष प्रा. अनिल देशमुख यांनी पत्रकाद्वारे सांगितले आहे. 

टॅग्स :शैक्षणिक