वार करून पळणारा प्रियकर ट्रकखाली ठार

By Admin | Updated: January 7, 2015 02:31 IST2015-01-07T02:31:11+5:302015-01-07T02:31:11+5:30

एका २३ वर्षांच्या रिक्षाचालक असलेल्या प्रियकराने प्रेयसीच्या गळ््यावर धारधार शस्त्राने वार केले.

A boy running under a lover killed under truck | वार करून पळणारा प्रियकर ट्रकखाली ठार

वार करून पळणारा प्रियकर ट्रकखाली ठार

दहिसरजवळील घटना : नियतीने लगेच घेतला बदला
मुंबई : एका २३ वर्षांच्या रिक्षाचालक असलेल्या प्रियकराने प्रेयसीच्या गळ््यावर धारधार शस्त्राने वार केले. वार करून तिला तिथेच रक्तबंबाळ अवस्थेत सोडून पळून जात असताना एका ट्रकने दिलेल्या धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या दरम्यान दहिसर पश्चिम द्रुतगती महामार्गावर घडली. अनिल दांडेकर (२३) असे मृताचे नाव आहे.
दहिसर पूर्व, काजूपाडा येथील हनुमान टेकडी परिसरात अनिल दांडेकर राहत असून, तो रिक्षाचालक होता. त्याचे याच परिसरात राहणाऱ्या एका १७ वर्षांच्या मुलीसोबत गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. सोमवारी संध्याकाळी शिकवणीला जात असताना तिच्याशी लग्न करण्याच्या निश्चयाने त्याने तिला रिक्षातून घेऊन पलायन केले. संध्याकाळी ९ च्या दरम्यान दोघांमध्ये वाद झाला आणि अनिलने रिक्षा दहिसर पश्चिम द्रुतगती महामार्गावर थांबवली. धारधार शस्त्राने अनिलने तिच्या गळ््यावर सात ते आठ वार केले. वार करून रक्तबंबाळ झालेल्या त्या मुलीला रिक्षात सोडून तो पळून जाण्याच्या बेतात होता़ त्यावेळी समोरून आलेल्या ट्रकने त्याला धडक दिली़ यात त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच दहिसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेतला. मुलीला उपचाराकरिता रुग्णालयात दाखल केले. मुलीकडे असलेल्या शिकवणीच्या बॅगेवरील फोन नंबरवरून पोलिसांनी शिकवणीमध्ये माहिती दिली. (प्रतिनिधी)

पे्रयसी बचावली; खासगी रुग्णालयात उपचार सुरू
१सोमवारी संध्याकाळी ४.३० च्या दरम्यान ही मुलगी शिकवणीला जाण्यासाठी निघाली, मात्र ती तिथे पोचलीच नाही. पीडित मुलगी शिकवणीला आली नाही, म्हणून शिकवणीतून तिच्या घरी फोन करण्यात आला.

२फोननंतर घरच्यांची शोधाशोध सुरू झाली. पीडित मुलगी गोरेगावच्या पाटकर महाविद्यालयात बारावीत शिकत आहे. तिच्यावर दहिसर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

३याप्रकरणी दहिसर पोलिसांनी एका अनोळखी व्यक्तीविरोधात निष्काळजीपणाने वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे.

४अनिल विरोधात ३०७ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. फरार ट्रकचालकाचा दहिसर पोलीस शोध घेत आहेत.

Web Title: A boy running under a lover killed under truck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.