बॉक्स ऑफिसवर एक व्हिलन’ची धूम

By Admin | Updated: June 30, 2014 23:07 IST2014-06-30T23:07:16+5:302014-06-30T23:07:16+5:30

बॉलीवूडला सध्या सुगीचे दिवस आले आहेत. जून महिन्यात प्रदर्शित झालेल्या सगळ्याच चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर चांगले यश मिळाले आहे.

At the box office, a villain smack | बॉक्स ऑफिसवर एक व्हिलन’ची धूम

बॉक्स ऑफिसवर एक व्हिलन’ची धूम

>बॉलीवूडला सध्या सुगीचे दिवस आले आहेत. जून महिन्यात प्रदर्शित झालेल्या सगळ्याच चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर चांगले यश मिळाले आहे. त्यामुळे उत्साहाचे वातावरण आहे. ‘हॉलीडे’ आणि ‘हमशकल्स’ या चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र गेल्या आठवडय़ात प्रदर्शित झालेल्या ‘एक व्हिलन’ चित्रपटाला तर अमाप लोकप्रियता मिळाली आहे. फक्त तीन दिवसांत त्याने पन्नास कोटींपेक्षा जास्त कमाई करत त्याने धमाका केला आहे. 
प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी त्याने 16 कोटींपेक्षा जास्त कमाई केली. त्यानंतर शनिवार आणि रविवारच्या सुटीचा भरपूर फायदा घेत त्याने 5क् कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. याआधी चित्रपट प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी 17 कोटींपेक्षा जास्त कमाई करण्याचा रेकॉर्ड सलमानच्या ‘जय हो’ चित्रपटाचा होता. त्यानंतर ‘एक व्हिलन’ने बाजी  मारली आहे. पहिल्या तीन दिवसांत मिळालेली भरघोस कमाई पाहता ‘एक व्हिलन’ 1क्क् कोटी क्लबमध्ये लवकरच स्थान मिळवेल, असे जाणकारांचे म्हणणो आहे. सोमवारीही चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसले. 
तर पंधरा दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या साजिद खानच्या ‘हमशकल्सने 1क् दिवसांत 61 कोटींची कमाई केली आहे. हा चित्रपट 6क् कोटींमध्ये बनला होता. यावरून थिएटरमध्ये या चित्रपटाची अवस्था काय असेल याचा अंदाज येतो. अक्षय कुमारच्या ‘हॉलीडे’ चित्रपटाने 1क्क् कोटी क्लबमध्ये स्थान मिळवत 111 कोटींच्या आसपास कमाई केली. सलमानच्याच जय हो चित्रपटानंतर एवढी कमाई करणारा हॉलीडे हा दुसरा चित्रपट ठरला आहे. या वर्षी या दोनच चित्रपटांनी 1क्क् कोटी क्लबमध्ये स्थान मिळवले हे विशेष. 
येत्या शुक्रवारी दोन चित्रपट प्रदर्शित होत आहेत. त्यापैकी विद्या बालनच्या ‘बॉबी जासूस’ या चित्रपटाविषयी उत्सुकता जास्त आहे. या चित्रपटात फेमस हीरो नसल्याने सर्व मदार विद्या बालनवर आहे. चित्रपटाची प्रसिद्धीही जोरदार करण्यात आली आहे. त्यामुळे विद्याची जादू किती प्रभाव पाडतेय तेकळेलच. 
या चित्रपटाबरोबर ‘लेकर हम दिवाना दिल’ हा सैफ अली  खानच्या कंपनीत बनलेला चित्रपट प्रदर्शित होणार आहे. राज कपूर यांचा नातू अरमान जैन या चित्रपटातून पदार्पण करणार आहे. त्याच्याबरोबर दीक्षा सेठ ही नवोदित अभिनेत्रीही आहे. 
 

Web Title: At the box office, a villain smack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.