बँक अध्यक्षाकडून लाच घेणारा गजाआड

By Admin | Updated: September 4, 2014 03:03 IST2014-09-04T03:03:21+5:302014-09-04T03:03:21+5:30

शहरातल्या एका मोठय़ा सहकारी बँकेच्या अध्यक्षाकडून दीड लाखांची लाच स्वीकारताना प्रकाश वसंत देशमुख या व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली.

A bouncer who takes bribe from the bank president | बँक अध्यक्षाकडून लाच घेणारा गजाआड

बँक अध्यक्षाकडून लाच घेणारा गजाआड

मुंबई : शहरातल्या एका मोठय़ा सहकारी बँकेच्या अध्यक्षाकडून दीड लाखांची लाच स्वीकारताना प्रकाश वसंत देशमुख या व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली.
एसीबीच्या माहितीनुसार, संबंधित सहकारी बँकेने आपल्या सभासदांना आणि संलग्न नागरी पतसंस्थांना तब्बल 119 कोटींचे कर्ज दिले आहे. त्यापैकी काही पतसंस्थांनी त्यांच्या कर्जदारांना नियमबाह्य पद्धतीने कर्जवाटप केले. हे लक्षात येताच सहकारी बँकेने पतसंस्थांविरोधात गुन्हे शाखेच्या आर्थिक गुन्हे विभागाकडे तक्रार केली. मात्र या पतसंस्थांनी सहकारी बँकेच्या संचालकांवर घोटाळ्याचे आरोप केले. तसेच दंडाधिकारी न्यायालयात खासगी तक्रारी दाखल केल्या. त्यावर न्यायालयाने संचालकांविरोधात गुन्हा नोंदविण्याचे आदेश घाटकोपर पोलिसांना दिले होते. त्यानुसार  घाटकोपर पोलिसांनी संचालकाच्या ंविरोधात गुन्हा नोंदवून पुढील कारवाई सुरू केली होती. दरम्यान, ही कारवाई तपास अधिका:याशी तडजोड करून मागे घेण्यासाठी देशमुख याने सहकारी बँकेच्या अध्यक्षाकडे 25 लाखांची मागणी केली. अध्यक्षाने देशमुखला दीड लाख दिलेही. मात्र देशमुख याने पुन्हा पैशांची मागणी केली. तेव्हा मात्र अध्यक्षाने एसीबीकडे देशमुखची तक्रार केली. प्राथमिक चौकशी देशमुखने लाच मागितल्याचे निष्पन्न होताच एसीबीने गुन्हा नोंदविला. काल रात्री अंधेरीतल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये सापळा रचून देशमुखला दीड लाखांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली. (प्रतिनिधी)

 

Web Title: A bouncer who takes bribe from the bank president