आरे कॉलनी सामुहिक बलात्कारप्रकरणी दोघे अटकेत

By Admin | Updated: May 3, 2014 14:52 IST2014-05-03T13:23:37+5:302014-05-03T14:52:36+5:30

गोरेगाव आरे कॉलनी येथील सामुहिक बलात्कार प्रकरणातील दोघा आरोपींना तामिळनाडू येथील त्यांच्या मूळ गावी पळून जाण्याच्या तयारीत असताना गुन्हे शाखेने दादर येथे अटक केली

Both of them were arrested in the Aare colony gang rape case | आरे कॉलनी सामुहिक बलात्कारप्रकरणी दोघे अटकेत

आरे कॉलनी सामुहिक बलात्कारप्रकरणी दोघे अटकेत

मुंबई: गोरेगाव आरे कॉलनी येथील सामुहिक बलात्कार प्रकरणातील दोघा आरोपींना तामिळनाडू येथील त्यांच्या मूळ गावी पळून जाण्याच्या तयारीत असताना गुन्हे शाखेने दादर येथे अटक केली. वेल्लीपांडी मालेअप्पन देवेंद्र (२९), जयराज तंगराज पल्लन देवेंद्र (२७) अशी आरोपींची नावे आहेत.
या दोघा आरोपींविरूद्ध आरे पोलीस ठाणे व अन्य ठिकाणी खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी आदी गुन्‘ांची नोंद आहे. या चौघा आरोपींची टोळी असून आरोपी वेलीपांडी देवेंद्र हरिजन हा टोळीचा प्रमुख आहे. आरे पोलीस अन्य आरोपींचा शोध घेत आहेत. या आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना १२ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Web Title: Both of them were arrested in the Aare colony gang rape case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.