वेशाव्यवसायासाठी मुंबईत आणलेल्या दोघींची सुटका

By Admin | Updated: July 18, 2015 01:12 IST2015-07-18T01:12:31+5:302015-07-18T01:12:31+5:30

वेशाव्यवसायासाठी मुंबईत आणलेल्या दोघींची सुटका

Both of them released in Mumbai for prostitution | वेशाव्यवसायासाठी मुंबईत आणलेल्या दोघींची सुटका

वेशाव्यवसायासाठी मुंबईत आणलेल्या दोघींची सुटका

शाव्यवसायासाठी मुंबईत आणलेल्या दोघींची सुटका
समाजसेवा शाखेची कारवाई

मुंबई: कोलकाता येथून नोकरीचे अमीष दाखवून मुंबईत आणलेल्या दोन तरुणींना वेशा व्यवसायासाठी एका खोलीत डांबून ठेवल्याची धक्कादायक घटना नागपाडा येथे घडली. यामध्ये फसलेल्या तरुणींनी दिलेल्या तूटपूंज्या माहितीच्या आधारे समाजसेवा शाखेने दोन मुलींची सुखरूप सुटका केली. याप्रकरणी सात नराधमांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडे कसून चौकशी सुरु आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळची कोलकाता येथील असलेल्या पीडित मुलींना मुंबई नोकरीचे अमीष दाखवून आणण्यात आले होते. त्यानंतर नागपाडा येथील आरएस निमकर मार्गावरील बनारस चाळीतील पहिल्या मजल्यावरील खोली क्रमांक १२ मध्ये डांबून ठेवले होते. वेश्या व्यवसायासाठी यांना जबरदस्ती करण्यात आली. बुधवारी सायंकाळी ७ वाजता संधी साधून एका मुलीने पोलीस नियंत्रण कक्षाला आपल्यासोबत झालेल्या अत्याचाराची माहिती दिली. मात्र घटनास्थळाबाबत माहिती नसल्याने केवळ फोरास रोड, आंब्याचे झाड आणि इमारतीखाली धूळ खात पडलेली काळ्या रंगाची बाईक एवढीच माहिती देवून तरुणीने फोन ठेवला.
पोलिसांनी तत्काळ या प्राथमिक माहितीच्या आधारे मुलीने सांगितलेला पत्ता शोध घेण्यास सुरुवात केली. अखेर समाजसेवा शाखेने नागपाडा परिसर पिंजून काढत या मुलींचा शोध घेत त्यांची सुखरूप सुटका केली. याप्रकरणी समाजसेवा शाखेने सात जणांना अटक केली असून आणखीन तीन आरोपींचा पोलीस शोध घेत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Both of them released in Mumbai for prostitution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.