Join us  

सेटलाईट फोन बाळगणाऱ्या दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2018 3:41 PM

यल्लो गेट पोलिसांनी केली कारवाई 

मुंबई - नुकतीच बेकायदेशीररीत्या स्वतः जवळ सेटलाईट फोन बाळगल्याप्रकरणी विशाल सिंग (वय - २८) आणि आशिष प्रजापती (वय - ३४)  या दोघांना यल्लो गेट पोलिसांनी अटक केली आहे. 

विशालचा भंगार माल खरेदी - विक्रीचा व्यवसाय आहे. भंगारात काढलेले जहाज घेवून येण्यासाठी आशिषला सांगितले. दुबई ते मुंबई असा प्रवास करून ते जहाज मुंबईत आणण्याचे काम आशिषला देण्यात आले होते. ठरल्याप्रमाणे आशिष जहाज आणण्यासाठी दुबईला आणि  १३ जुलैला समुद्रमार्गे प्रवास सुरु केला. या प्रवासादरम्यान आशिषने विशालला १९ आणि २० जुलैदरम्यान  संपर्क साधण्यासाठी सेटलाईट फोनचा वापर केला होता. असाच सेटलाईट फोन मुंबईवर झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात वापरण्यात आला होता.

या सेटलाईट फोन वापरल्याबाबत खबर  गुप्तचर यंत्रणेला कळाले. त्यानंतर केंद्र गुप्तचर यंत्रणेने भारतीय तटरक्षक दलास याबाबत  माहिती दिली. भारतीय तटरक्षक दलाने ते संशयित शोधून काढले आणि 'क्रू'ला ताब्यात  घेण्यात  आले. मात्र, अटकेदरम्यान आशिषने सेटलाईट फोन वापराबाबत नकार दिला होता. नंतर, त्याने पोलिसांना सांगितले की, विशालने सेटलाईट फोन वापर बॅन असल्याचे सांगितले. विशालच्या सांगण्यावरून मी तो नष्ट  करण्याच्या हेतूने समुद्रात फेकून दिला अशी कबुली आशिषने पोलिसांना दिली. त्यानंतर यल्लो गेट पोलिसांनी भा.दं.वि. कलम २०१ आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ५ जुलैला देखील ३७ वर्षिय नायझेरियन नागरिक असलेल्या इचीला सहार पोलिसांनी सेटलाईट फोन बाळगल्याप्रकरणी वायरलेस टेलिग्राफ कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :मुंबईगुन्हाअटक