पतीच्या मित्रकडून दोघींवर बलात्कार

By Admin | Updated: November 1, 2014 02:00 IST2014-11-01T02:00:47+5:302014-11-01T02:00:47+5:30

एका 23 वर्षीय विवाहितेवर बलात्कार झाला. तर दुस:या घटनेत अंधेरी पूर्व परिसरात राहणा:या 21 वर्षीय विवाहितेवर बलात्कार झाल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली.

Both raped by husband's friend rape | पतीच्या मित्रकडून दोघींवर बलात्कार

पतीच्या मित्रकडून दोघींवर बलात्कार

मुंबई : गोरेगाव पश्चिम येथील सिद्धार्थनगर परिसरात एका 23 वर्षीय विवाहितेवर बलात्कार झाला. तर दुस:या घटनेत अंधेरी पूर्व परिसरात राहणा:या 21 वर्षीय विवाहितेवर बलात्कार झाल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. या दोन्ही घटनांमध्ये पीडित महिलांवर पतीच्या मित्रकडूनच बलात्कार करण्यात आला आहे. 
गोरेगाव ओशिवरा येथे राहणारी पीडित महिला व आरोपी हे एकमेकांना ओळखत होते. पीडित महिलेचा पती व आरोपी यांची बोरीवली लॉकअपमध्ये ओळख झाली होती. दोघेही बलात्काराच्याच गुन्ह्यांत जेलमध्ये होते. दोघांचीही काही दिवसांपूर्वी जामिनावर सुटका झाली होती. त्यानंतर आरोपीचे मित्रच्या घरी येणो-जाणो होते. पीडित महिलेचे दुसरे लग्न होते तसेच तिचा नवरा तिच्याच अल्पवयीन बहिणीवर बलात्कार केल्याप्रकरणी जेलमध्ये होता. पीडित महिलेला आरोपीने काम देतो असे सांगून तो पेइंग गेस्ट म्हणून राहत असलेल्या घरी बोलावले आणि तेथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर तिने आरडाओरडा करताच आरोपीने तेथून पळ काढला. त्या घटनेनंतर पीडित महिलेने गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली असता, पोलिसांनी आरोपीविरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणातील आरोपी मोहमद अली खान हा फरार आहे.
दुस:या घटनेतील 21वर्षीय पीडित महिला अंधेरी पूर्व चिमटपाडा परिसरात राहते. मुकेश भोला यादव असे आरोपीचे नाव आहे. दोन दिवसांपूर्वी त्या महिलेचा पती कामानिमित्त बाहेर गेला होता. पतीला येण्यास उशीर झाल्यामुळे ती दाराला कडी लावून झोपली होती, रात्री आरोपीने कडी काढून आत प्रवेश केला. आरोपीने धमकी देत मारहाण करून बलात्कार केला. महिलेने आरडाओरड करताच स्थानिकांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले व सहार पोलिसांच्या स्वाधीन केले. पीडित महिलेचा पती व आरोपी हे दोघे पूर्वी एका रूममध्ये राहत होते. या घटनेबाबत पीडित महिलेच्या पतीला कळताच त्याला मानसिक धक्का बसला. आरोपीला  न्यायालयाने 1 नोव्हेंबर्पयत पोलीस कोठडी सुनावली आहे. (प्रतिनिधी)

 

Web Title: Both raped by husband's friend rape

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.