आमदार कथोरे यांच्या गाडीला धडकून दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:24 IST2020-12-14T04:24:52+5:302020-12-14T04:24:52+5:30

टिटवाळाजवळ अपघात : तिघांना किरकोळ दुखापत लोकमत न्यूज नेटवर्क अंबरनाथ/टिटवाळा : मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांच्या गाडीला ...

Both died after being hit by MLA Kathore's car | आमदार कथोरे यांच्या गाडीला धडकून दोघांचा मृत्यू

आमदार कथोरे यांच्या गाडीला धडकून दोघांचा मृत्यू

टिटवाळाजवळ अपघात : तिघांना किरकोळ दुखापत

लोकमत न्यूज नेटवर्क

अंबरनाथ/टिटवाळा : मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांच्या गाडीला रविवारी सायंकाळी एका दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिल्याने मोठा अपघात झाला. यात दुचाकीवरील तरुण आणि तरुणी दोघांचा मृत्यू झाला असून, कथोरे यांनाही किरकोळ दुखापत झाली आहे.

आमदार कथोरे हे टिटवाळा येथून एक कार्यक्रम आटपून पुन्हा बदलापूरच्या दिशेने येत असताना, कल्याण ग्रामीण भागातील दहागाव-वाहुली गावाजवळ एका भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने कथोरे यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार अमित नंदलाल सिंग (२२) आणि त्याच्या मागे असलेली तरुणी सिमरन दीपक सिंग (१८, रा. नेतवली) यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल केले असता, उपचारादरम्यान त्या दोघांचाही मृत्यू झाला आहे. आमदार यांच्या गाडीचे चालक आणि सुरक्षारक्षक यांनाही किरकोळ दुखापत झाली असून, त्यांना बदलापूरमधील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी टिटवाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Both died after being hit by MLA Kathore's car