केबलच्या वायर चोरीप्रकरणी दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:36 IST2021-02-05T04:36:44+5:302021-02-05T04:36:44+5:30

डी. एन. नगर पोलिसांची कारवाई लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : इमारतीच्या कामासाठी ठेवण्यात आलेली लाखो रुपयांची केबलची वायर अंधेरी ...

Both arrested in cable wire theft case | केबलच्या वायर चोरीप्रकरणी दोघांना अटक

केबलच्या वायर चोरीप्रकरणी दोघांना अटक

डी. एन. नगर पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : इमारतीच्या कामासाठी ठेवण्यात आलेली लाखो रुपयांची केबलची वायर अंधेरी परिसरातून चोरी करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी मालाड व नालासोपारा परिसरातून शनिवारी दोघांना अटक करून मुद्देमाल परत मिळविला.

अंधेरीच्या बर्फीवाला रोडजवळील इमारतीच्या गोडाऊनमधून २४ जानेवारी रोजी १ लाख ५६ हजार १५३ रुपये किमतीचे दीड एमएमच्या केबल वायरचे २४ बंडल लंपास करण्यात आले होते. याप्रकरणी डी. एन. नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पथकाने तांत्रिक तपास करत मालाड व नालासोपारा परिसरातून ए. गुप्ता व नीरजकुमार पी. या दोघांना मुद्देमालासह अटक केली. अटक आरोपींची पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

...........................

Web Title: Both arrested in cable wire theft case