शस्त्र विक्रीच्या प्रयत्नातील दोघांना अटक
By Admin | Updated: October 8, 2014 00:53 IST2014-10-08T00:53:21+5:302014-10-08T00:53:21+5:30
पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या दोघांना खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे. त्यांच्यावर तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शस्त्र विक्रीच्या प्रयत्नातील दोघांना अटक
नवी मुंबई : पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या दोघांना खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे. त्यांच्यावर तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खंडणीविरोधी पथकाने महापे येथे ठाणे - बेलापूर मार्गावर ही कारवाई केली आहे. विनापरवाना शस्त्र विक्रीच्या प्रयत्नात असलेले दोघे जण तेथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार खंडणीविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राजन जगताप यांच्या पथकाने महापे बस थांबा परिसरात सापळा रचला. यावेळी तेथे आलेल्या दोघा तरुणांना ताब्यात घेवून त्यांची झडती घेण्यात आली असता त्यांच्याकडे एक गावठी कट्टा, एक काडतूस असा ३१ हजार रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला. प्रदीप कैलास लहाने (२०) आणि राकेश रामदुलारे जयस्वाल (२६) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.हे दोघेही गेल्या एक महिन्यापासून पिस्तूल विक्रीच्या प्रयत्नात होते. याची माहिती खंडणी विरोधी पथकाला मिळाल्यावर ही कारवाई केली.