सेनेचे दोन्ही नगराध्यक्ष बिनविरोध

By Admin | Updated: May 16, 2015 22:51 IST2015-05-16T22:51:32+5:302015-05-16T22:51:32+5:30

अंबरनाथ नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणूकीचा अपक्ष उमेदवाराचा अर्ज मागे घेण्यात आल्याने शिवसेना उमेदवार प्रज्ञा बनसोडे यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.

Both of the army chiefs have been unanimously elected | सेनेचे दोन्ही नगराध्यक्ष बिनविरोध

सेनेचे दोन्ही नगराध्यक्ष बिनविरोध

अंबरनाथ : अंबरनाथ नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणूकीचा अपक्ष उमेदवाराचा अर्ज मागे घेण्यात आल्याने शिवसेना उमेदवार प्रज्ञा बनसोडे यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. तर बदलापूरात भाजपा उमेदवाराने माघार घेतल्याने शिवसेनेचे वामन म्हात्रे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. दोन्ही नगराध्यक्षांची औपचारिक घोषणा १८ मे रोजी होणार आहे.
अंबरनाथ नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक १८ मे रोजी असुन या पदाच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत १६ मे रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत होती. अंबरनाथमध्ये शिवसेनेच्या वतीने प्रज्ञा बनसोडे यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर भाजपा, राष्ट्रवादी,काँग्रेस आणि काही अपक्ष नगरसेवक एकत्रित येऊन त्यांनी अपक्ष नगरसेविका लता जाविर यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता. शिवसेनेला एकाकी पाडून सत्तेची गणिते रचण्याचा प्रयत्न इतर सर्व पक्षांनी केला होता. मात्र बहुमताचा आकडा आणि सर्व नगरसेवक एकत्रित येत नसल्याने अपक्ष उमेदवार हिराबाई जाविर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यांचा अर्ज मागे घेण्यात आल्याने प्रज्ञा बनसोडे यांची बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाल आहे.
बदलापूरात मतदारांनी शिवसेनेला पूर्ण बहुमत दिले असुन शिवसेनेच्या वतीने वामन म्हात्रे यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तर भाजपाच्या वतीने संजय भोईर यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र भाजपाला बहुमताचा आकडा गाठने शक्य नसल्याने त्यांनी शिवसेनेला नगराध्यक्षपद बिनविरोध दिले. भोईज यांचा अर्ज मागे घेण्यासाठी त्यांच्यासोबत स्वत: शिवसेनाल उमेदवार वामन म्हात्रे हे देखील होते. सत्तेची गणिते न बसल्याने भाजपानेही सेनेसोबत जुळवुन घेण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. (प्रतिनिधी)

 

Web Title: Both of the army chiefs have been unanimously elected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.