शस्त्रसाठ्यासह दोघे गजाआड

By Admin | Updated: January 3, 2015 00:52 IST2015-01-03T00:52:47+5:302015-01-03T00:52:47+5:30

शस्त्रसाठ्याची विक्री करण्यासाठी आलेल्या दोन सराईत आरोपींना गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे.

Both arms and ammunition along with the weapon | शस्त्रसाठ्यासह दोघे गजाआड

शस्त्रसाठ्यासह दोघे गजाआड

मुंबई: शस्त्रसाठ्याची विक्री करण्यासाठी आलेल्या दोन सराईत आरोपींना गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. या आरोपींवर यापूर्वी देखील शहरातील विविध पोलीस ठाण्यांत अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती गुन्हे शाखेने दिली आहे.
नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी शहरात चोख बंदोबस्त ठेवला होता. तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या गुन्हेगारांवर देखील पोलिसांची करडी नजर होती. ३१ तारखेच्या मध्यरात्री अशाच प्रकारे दोन सराईत गुन्हेगार वांद्रे तलावाजवळ शस्त्रसाठ्याची विक्री करण्यासाठी येणार होते. गुन्हे शाखा युनिट ९च्या अधिकाऱ्यांना ही माहिती मिळताच त्यांनी या परिसरात तत्काळ सापळा रचला होता. (प्रतिनिधी)

च्रात्री साडेबाराच्या सुमारास दोन्ही आरोपी या ठिकाणी दाखल झाले. पोलिसांनी तत्काळ दोघांवर झडप घालून त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ पोलिसांना एक रिव्हॉल्व्हर आणि चार जिवंत काडतुसे आढळली. त्यानुसार पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल करीत त्यांना अटक केली आहे. दोन्ही आरोपी हे सराईत गुन्हेगार असून, यापूर्वी त्यांच्यावर मुंबई आणि ठाण्यातील काही पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

 

Web Title: Both arms and ammunition along with the weapon