Join us
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यूअगोदरच शवागारात!, ब्रेनडेड रुग्णाला मृत घोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 05:31 IST

नागपुरातील एका खासगी हॉस्पिटलने ब्रेनडेड (मेंदूमृत) घोषित केलेल्या रुग्णाला छिंदवाडा येथील जिल्हा रुग्णालयाने मृत घोषित करून शवविच्छेदनासाठी शवागारात ठेवल्याने सोमवारी एकच खळबळ उडाली.

नागपूर/छिंदवाडा : नागपुरातील एका खासगी हॉस्पिटलने ब्रेनडेड (मेंदूमृत) घोषित केलेल्या रुग्णाला छिंदवाडा येथील जिल्हा रुग्णालयाने मृत घोषित करून शवविच्छेदनासाठी शवागारात ठेवल्याने सोमवारी एकच खळबळ उडाली. मेंदूमृत रुग्ण जिवंत असल्याचे लक्षात आल्यावर पुन्हा नागपूरच्या एका खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले. रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, ब्रेनडेड रुग्ण चार तास शवागारात होता.छिंदवाडा येथील रहिवासी हिमांशु भारद्वाज (३०) रविवारी दुपारी रस्ता अपघातात जखमी झाला. रात्री साधारण १ वाजता त्याला धंतोली येथील न्यूरॉन हॉस्पिटलमध्ये दाखल केले. येथील डॉक्टरांनी तपासून ‘ब्रेनडेड’ घोषित केले. सोबतच नातेवाईकांना अवयवदान करण्यासाठी प्रोत्साहितही केले. यासाठी हिमांशुला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) घेऊन जाण्याचा सल्ला दिला. सकाळी ५ वाजता छिंदवाडा जिल्हा रुग्णालयात नेल्यानंतर तेथील डॉ. ठाकूर यांनी हिमांशुला मृत घोषित करुन शवविच्छेदनासाठी शवागारात ठेवले. सकाळी शवविच्छेदनासाठी कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सफाई कर्मचारी शवागारातून हिमांशुचे शव बाहेर काढण्यासाठी आला. त्यावेळी बॉडीमध्ये त्याला हालचाली जाणवल्या. त्याने माहिती दिल्यानंतर शवविच्छेदनासाठी आलेले डॉ. निर्णय पांडे यांना तातडीने शस्त्रक्रियाच्या वॉर्डात नेऊन उपचार सुरू केले. याची माहिती नातेवाईकांनाही देण्यात आली. त्यांनी नागपूर गाठले. धंतोली येथील शुअरटेक हॉस्पिटलमध्ये भरती केले.कर्तव्यावर असलेले डॉ. ठाकूर यांनी अहवालात नमूद केले आहे की, ज्या अवस्थेत रुग्णाला हॉस्पिटलमध्ये आणले त्यावेळी त्याच्या नाडीचे स्पंदन बंद होते. हृदयाने काम करणे बंद केले. या आधारवर त्याला मृत घोषित केले.- डॉ. सुशील दुबे, वैद्यकीय अधिकारी, जिल्हा रुग्णालय, छिंदवाडाब्रेनडेड होणे म्हणजे रुग्णाचा मृत्यू होणे असे नाही. ब्रेनडेड झाल्यावरही रुग्णाचे हृदय आणि इतर अवयव कार्य करीत असतात. या प्रकरणातही असे झाले असावे.- डॉ. जय देशमुख, वरिष्ठ विशेषज्ञ

टॅग्स :मृत्यूमुंबई