बोरीवली, दहीसर मतदारसंघ
By Admin | Updated: September 26, 2014 21:40 IST2014-09-26T21:40:29+5:302014-09-26T21:40:29+5:30
बोरीवली मतदारसंघ

बोरीवली, दहीसर मतदारसंघ
ब रीवली मतदारसंघआघाडी व महायुती जरी दुभंगली असली तरी त्याचा फारसा परिणाम बोरीवली मतदारसंघात जाणवार नाही. गेले कित्येक वर्ष बोरीवली विधानसभा मतदारसंघ हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. भाजपातर्फे आज विनोद तावडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तर शिवसेेनेकडून या मतदारसंघाकरीता माजी नगरसेवक दामोदर म्हात्रे यांचे नाव पुढे येत आहे. मनसेकडून नयन कदम यांंंंच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. तर काँग्रेसकडून अशोक सुत्राळे हे निवडणूक लढवणार आहेत. राष्ट्रवादीकडून अद्याप कोणाचेही नाव पुढे आलेले नाही. बोरीवली विधानसभा मतदारसंघात मराठी व गुजराती भाषिक वर्गाचे प्राबल्य आहे. २००९ साली बोरीवली मतदारसंघातून भाजपाच्या गोपाळ शेी यांनी २० हजार मतांनी विजय मिळवून मनसेच्या नयन कदम यांचा पराभव केला होता. तथापि, ५ प्रमुख राजकीय पक्षांमध्ये होणारी मतांची विभागणी अनपेक्षित निकाल लावणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष आहे................................................दहिसर मतदार संघदहिसर विधानसभा मतदार संघ हा शिवसेनेचा गड म्हणून परिचित आहे. या मतदारसंघातून शिवसेनेतून विनोद घोसाळकर व कॉंग्रेसतर्फे नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी उमेदवारी अर्ज भरला. या मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत. भारतीय जनता पक्षातर्फे नगरसेविका मनिषा चौधरी व नगरसेविका शुभा राऊळ देखील उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. शुभा राऊळ अपक्ष उभ्या राहणार की एखाद्या पक्षाकडून याची उत्सुकता कायम आहे. मनसेकडून राजेश येरुणकरांंचे नाव पुढे येत आहे. ऐनवेळी शुभा राऊळ यांनाही मनसेकडून तिकीट जाऊ शकते. या मतदारसंघात मराठी, उत्तर भारतीय, ख्रिस्ती भाषिकांचे प्राबल्य आहे. २००९ साली या मतदारसंघातून २००९ मध्ये मनसेच्या संजना घाडी यांचा पराभव करुन शिवसेनेच्या विनोद घोसाळकर यांनी दहिसर मतदारसंघावर विजय मिळविला होता.