बोअरवेल ओसंडली, कोरडा तलाव पाण्याने भरला
By Admin | Updated: May 5, 2015 00:10 IST2015-05-05T00:10:26+5:302015-05-05T00:10:26+5:30
भाताणे परिसरातील मडकेपाड्यातील एका शेतातील बोअरवेलमध्ये जमेतेम पाणी असताना नुकत्याच आलेल्या भूकंपामुळे परिणाम होऊन पाणी

बोअरवेल ओसंडली, कोरडा तलाव पाण्याने भरला
पारोळ : भाताणे परिसरातील मडकेपाड्यातील एका शेतातील बोअरवेलमध्ये जमेतेम पाणी असताना नुकत्याच आलेल्या भूकंपामुळे परिणाम होऊन पाणी ओसंडून वाहू लागले. या पाण्यातून जवळ असलेला कोरड्या तलावात पाणी जमा झाले आहे.
या पाड्यातील शेतकऱ्याने १५ दिवसापूर्वी ३०० फूट बोअरवेल खोदली. तेव्हा जेमतेम पाणी लागले. त्यानंतर आलेल्या भूकंपानंतर पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली.
विशेष म्हणजे, शेतकऱ्यांना उन्हाळी पिके घेण्यासाठी बांधलेला तलाव कोरडा पडला
असताना या घटनेनंतर त्यात
मोठ्या प्रमाणात पाणी साचले
आहे. हा प्रकार बघण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे.
(वार्ताहर)