बुकींचा अंदाज ‘आप’
By Admin | Updated: February 7, 2015 03:03 IST2015-02-07T03:03:11+5:302015-02-07T03:03:11+5:30
निकालाच्या अंदाजाच्या पैजांचा बाजार मांडणाऱ्या बुकींनीही अखेरच्या टप्प्यात ‘आप’च्या पारड्यात वजन टाकणारे सुधारित दर जाहीर केले.

बुकींचा अंदाज ‘आप’
दिल्लीत बाजार गरम : १२ हजार कोटींची उलाढाल शक्य
डिप्पी वांकाणी - मुंबई
दिल्ली विधानसभा निवडणुकीतील मतदानाला अवघे काही तास उरले असताना निकालावरील सट्ट्याच्या बदललेल्या दरांनी अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला (आप) मिळत असलेल्या भरघोस पाठिंब्यावर जणू शिक्कामोर्तब केले आहे. निकालाच्या अंदाजाच्या पैजांचा बाजार मांडणाऱ्या बुकींनीही अखेरच्या टप्प्यात ‘आप’च्या पारड्यात वजन टाकणारे सुधारित दर जाहीर केले. मुख्यमंत्रिपदाची माळ केजरीवाल यांच्याच गळ्यात पडणार आणि भाजपाचा मुखभंग होणार, असे या सट्टेबाजीचा रोख सांगत आहे.
भाजपाला या वेळी निवडणूक भारी जात असून, २५ जागांच्यावर मजल गाठणेही अवघड जाईल असे बुकींना वाटते. मोदी लाटेवर स्वार झालेल्या भाजपाला आप तुल्यबळ लढत देईल असा अंदाज लावत याआधीचे भाव ठरले होते. १५ दिवसांपूर्वीही भाजपाला अनुकूल अशीच हवा होती. तळागाळातील परिस्थिती पाहता आप बाजी मारेल असा आढावा आम्ही नव्याने घेतला आहे, असे बुकींनी नमूद केले.
निवडणुकीवर असा लागतोय सट्टा
पक्ष जागापूर्वीचे दरसध्याचे दर
भाजपा २० उघडले नाही२१ पैसे
२५ ३० पैसे६७ पैसे
३० ५५ पैसे१.१० रुपये
३५ १.१० रुपये३ रुपये
४० १.८० रुपये७ रुपये
४५ २.९० रुपयेउघडले नाही
आप१५२७ पैसेउघडले नाही
२०६७ पैसेउघडले नाही
२५३.७५ रुपये २२ पैसे
३२उघडले नाही ६८ पैसे
३५६ रुपये २.९० रुपये
४०उघडले नाही ६.५० रुपये
आॅनलाइन सट्टा...
निवडणुकीच्या दिवशी १० हजार कोटींच्या उलाढालीचा अंदाज असून, बुकींनी वेबसाईटच्या आधारे आॅनलाइन सट्टा स्वीकारणे सुरू केले आहे. अनेक बुकी सट्ट्याचे केंद्र असलेल्या जयपूरबाहेर पडणार असून, त्यांची मतदानावर बारीक नजर असेल.