बुकींनी फिरवली निवडणुकीकडे पाठ
By Admin | Updated: October 2, 2014 01:59 IST2014-10-02T01:59:46+5:302014-10-02T01:59:46+5:30
युती तुटून निर्माण झालेल्या राजकीय अनिश्चिततेमुळे सट्टेबाजांनी (बुकींनी) या वेळी निवडणुकीवर सट्टा लावण्यापासून लांब राहणोच पसंत केले आहे.
बुकींनी फिरवली निवडणुकीकडे पाठ
डिप्पी वांकाणी - मुंबई
महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना-भाजपा या प्रमुख पक्षांतील युती तुटून निर्माण झालेल्या राजकीय अनिश्चिततेमुळे सट्टेबाजांनी (बुकींनी) या वेळी निवडणुकीवर सट्टा लावण्यापासून लांब राहणोच पसंत केले आहे. एरव्ही केवळ मुंबईच्या निवडणुकांवर सुमारे 12,क्क्क् कोटी रुपयांचा सट्टा लागतो.
बुकींनी दिलेल्या माहितीनुसार ते पितृपक्ष संपल्यावर नवरात्रौत्सवाच्या पहिल्या दिवशी सट्टय़ाचे दर जाहीर करणार होते. पण या वेळी सर्वच पक्ष स्वबळावर निवडणूक लढवत असून जनता कोणाला आणि कसा कौल देईल याचा काहीच अंदाज बांधता येत नसल्याने बुकींनी यंदा या फंदात न पडण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई, जयपूर आणि अन्य ठिकाणच्या बुकींची दिल्लीत एक बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. बुकींना वाटत होते की काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना-भाजपा युती टिकेल. पण आता एकंदर परिस्थिती इतकी अनिश्चित झाली आहे की बुकींनी निवडणूक निकालांवर पैसे लावून नसता धोका पत्करण्याचे टाळले आहे. बुकींच्या मते, सर्वच ठिकाणी उमेदवार फार कमी मतफरकाने निवडून येतील आणि कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळेल, असे सांगता येत नाही.
मुंबईतील एकेका उमेदवारावर साधारण तीनशे ते साडेतीनशे कोटींचा सट्टा लागतो. याही वेळी काही पक्षांनी आणि उमेदवारांनी त्यांच्यावर काय भावाने सट्टा लागण्याची शक्यता आहे, अशी विचारणा काही बुकींकडे केली. पण पाण्यात राहून मगरीशी वैर करण्यापेक्षा बुकींनी त्या फंदातच न पडणो पसंत केले आहे.