पुस्तक नव्हे ‘डॉक्टर’

By Admin | Updated: July 10, 2014 00:40 IST2014-07-10T00:40:23+5:302014-07-10T00:40:23+5:30

रुग्णाची भाषा समजणो अत्यंत महत्त्वाचे असते. डॉक्टरी पेशातील माहिती सामान्यांना सोप्या भाषेत कळेल, अशी माहिती या पुस्तकात आहे.

Book Not 'Doctor' | पुस्तक नव्हे ‘डॉक्टर’

पुस्तक नव्हे ‘डॉक्टर’

मुंबई : रुग्णाची भाषा समजणो अत्यंत महत्त्वाचे असते. डॉक्टरी पेशातील माहिती सामान्यांना सोप्या भाषेत कळेल, अशी माहिती या पुस्तकात आहे. त्यामुळे हे पुस्तक नव्हे तर ‘डॉक्टर’ असल्याचे मत महाराष्ट्र विश्वकोश निर्मिती मंडळाच्या अध्यक्षा डॉ. विजया वाड यांनी व्यक्त केले.
प्रसिद्ध हवाई छायाचित्रकार गोपाळ बोधे आणि डॉ. स्वाती आणि डॉ. अविनाश सुपे यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या ‘आरोग्य संपदा’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. सायन रुग्णालयातील फिजीओलॉजी सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात पालिकेच्या वैद्यकीय शिक्षण संचालिका सुहासिनी नागदा, कौस्तुभ बोधे आदी उपस्थित होते.
डॉ. सुपे यांचे हे पुस्तक दृष्टिहिनांसाठी ध्वनिफितीत उपलब्ध व्हावे, अशी इच्छा विजया वाड यांनी व्यक्त केली. जागतिकीकरणामुळे मोठय़ा प्रमाणावर माहिती मिळते, पण ती योग्य असेल याची खात्री नसते. त्यामुळे आरोग्य विषयावर लिखाण व्हावे, अशी बोधे यांची इच्छा होती, असे मनोगत डॉ. अविनाश सुपे यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)
 
‘गोपाळ बोधे फाउंडेशन ट्रस्ट’ची स्थापना!
प्रसिद्ध हवाई छायाचित्रकार गोपाळ बोधे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘गोपाळ बोधे फाउंडेशन ट्रस्ट’ची स्थापना केली. या ट्रस्टच्या समितीत बोधे यांच्या पत्नी, त्यांचा मुलगा कौस्तुभ बोधे, डॉ. अविनाश सुपे आणि पत्रकार किरण ठाकूर असतील. या फाउंडेशनतर्फे हवाई छायाचित्रण आणि दस्तऐवज तयार करण्याचे प्रशिक्षण देणार आहे. 

 

Web Title: Book Not 'Doctor'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.