बॉम्बची अफवा पसरविणारा गजाआड
By Admin | Updated: November 14, 2015 03:22 IST2015-11-14T03:22:20+5:302015-11-14T03:22:20+5:30
सायन, केईएम रुग्णालयात बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरविणाऱ्या आरोपीच्या गुन्हे शाखेने गुरुवारी मुसक्या आवळल्या. शक्ती शिंगर वेलू असे आरोपीचे नाव असू

बॉम्बची अफवा पसरविणारा गजाआड
मुंबई : सायन, केईएम रुग्णालयात बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरविणाऱ्या आरोपीच्या गुन्हे शाखेने गुरुवारी मुसक्या आवळल्या. शक्ती शिंगर वेलू असे आरोपीचे नाव असून, तो पालिकेच्या जकात नाक्यावर काम करतो. या प्रकरणी आझाद मैदान पोलीस अधिक तपास करीत आहेत.
पोलीस नियंत्रण कक्षास शुक्रवारी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास वेलूने कॉल केला होता. ‘मै बंगाल से आया हू... और एक आदमी मेरे पास आया और बोला की, सायन-केईएम अस्पताल में बॉम्ब रखा हैं,’ अशी माहिती देऊन वेलूने फोन बंद केला होता. पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांपैकी असलेल्या सायन, केईएम रुग्णालयांच्या सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी म्हणून रुग्णालयांची तपासणी करण्यात आली.
गुन्हे शाखेच्या पथकाने मोबाइल लोकेशनच्या आधारे वेलूच्या मुसक्या आवळल्या. केवळ मजा म्हणून वेलूने नियंत्रण कक्षास कॉल करून खोटी माहिती
दिल्याचे समोर आले. तो पालिकेच्या चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी असून, जकात नाक्यावर काम करीत असल्याचे तपासात समोर आले. पुढील चौकशीसाठी त्याला आझाद मैदान पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती आझाद मैदान पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक नरेंद्र सिंग यांनी दिली. (प्रतिनिधी)