अहमदाबाद-चेन्नई एक्स्प्रेसमध्ये बॉम्बची अफवा
By Admin | Updated: November 17, 2015 01:44 IST2015-11-17T01:44:18+5:302015-11-17T01:44:18+5:30
अहमदाबाद - चेन्नई एक्स्प्रेसमध्ये बॉम्ब ठेवली असल्याच्या अफवेने सोमवारी खळबळ उडाली. ट्रेन पनवेल स्थानकामध्ये थांबवून दोन तास बॉम्बशोधक पथकाकडून

अहमदाबाद-चेन्नई एक्स्प्रेसमध्ये बॉम्बची अफवा
नवी मुंबई : अहमदाबाद - चेन्नई एक्स्प्रेसमध्ये बॉम्ब ठेवली असल्याच्या अफवेने सोमवारी खळबळ उडाली. ट्रेन पनवेल स्थानकामध्ये थांबवून दोन तास बॉम्बशोधक पथकाकडून सर्व डब्यांची व साहित्याची तपासणी करण्यात आली. परंतु कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. अहमदाबादकडे जाणाऱ्या एक्स्प्रेसमध्ये बॉम्ब ठेवला असल्याचा फोन अज्ञात व्यक्तीने रेल्वे कार्यालयात केला होता. प्रशासनाने तात्काळ एटीएसला याविषयी माहिती दिली.
रेल्वे पनवेल स्थानकामध्ये थांबवून सर्व प्रवाशांना खाली उतरविण्यात आले. बॉम्बशोधक पथक, एटीएस व डॉगस्क्वॉडच्या सहाय्याने प्रत्येक डब्यांमध्ये कसून तपासणी केली. परंतु कोठेही बॉम्ब सापडला नाही. अफवा असल्याचे स्पष्ट होताच प्रवाशांसह सर्वांनीच सुटकेचा श्वास सोडला. यामुळे दोन तास रेल्वे पनवेल स्थानकामध्ये थांबविण्यात आली होती. सुरक्षेचा उपाय म्हणून बॉम्ब डिस्पोजल पथक, रुग्णवाहिका बोलावण्यात आल्या होत्या. रेल्वे स्टेशन परिसरातील बंदोबस्त वाढविण्यात आला होता.