दिल्लीच्या घटनेने बॉलीवूडही व्यथित
By Admin | Updated: December 11, 2014 01:08 IST2014-12-11T01:08:50+5:302014-12-11T01:08:50+5:30
गेल्या आठवडय़ात दिल्लीत घडलेल्या बलात्काराच्या घटनेने बॉलीवूडही व्यथित झाले आहे. ही घटना निंदनीय असल्याचे सांगत आपण हताश झाल्याचे अनेकांनी म्हटले आहे.

दिल्लीच्या घटनेने बॉलीवूडही व्यथित
मुंबई : गेल्या आठवडय़ात दिल्लीत घडलेल्या बलात्काराच्या घटनेने बॉलीवूडही व्यथित झाले आहे. ही घटना निंदनीय असल्याचे सांगत आपण हताश झाल्याचे अनेकांनी म्हटले आहे. अशा घटना दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे महिलांच्या सुरक्षेसाठी गंभीर पावले उचलण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
सोशल नेटवर्किग साइट्सवर सेलीब्रिटींनी यावर तिखट प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. आपण आरामात आणि सुरक्षित प्रवास करू शकू या विचारानेच लोक जास्त भाडे देऊन टॅक्सीचे बुकिंग करणो पसंत करू लागले आहेत. मात्र अशा घटनांमुळे आता असा प्रवास करण्यासही कोणी धजावणार नाही. सरकारकडून हा प्रश्न जेव्हा सुटायचा तेव्हा सुटणारच आहे. पण त्यादरम्यान अजून काय काय भोगावे लागेल त्याची कल्पनाही नकोशी वाटते, असे अक्षय कुमारने म्हटले आहे.
तर दिग्दर्शक करण जोहरने टॅक्सी बुकिंग घेणा:या मुख्य कंपनीलाच धारेवर धरले आहे. त्या माणसाची योग्य शहानिशा करून त्याला कामावर ठेवावे असे कंपनीला वाटले नाही का? असे दुर्लक्ष करणा:या कंपनीला लोकांची सेवा करण्याचा काही अधिकार नाही. तर भविष्यात महिलांनी जास्त खबरदारी घेणो गरजेचे असल्याचे मत संगीतकार विशालने मांडले आहे. अशा प्रकारे प्रवास करताना संबंधित गाडीची संपूर्ण माहिती आणि ड्रायव्हरच्या फोटोची माहिती घरातल्या लोकांना देण्याचा आता पर्याय उपलब्ध असायला हवा, असेही त्याने म्हटले आहे.
ज्येष्ठ निर्माता मुकेश भट्ट म्हणाले की, दोन वर्षापूर्वी निर्भया प्रकरण झाले तेव्हा बॉलीवूडने लोकांसमवेत एकत्र येऊन अशा घटना रोखण्यासाठी प्रभावी मार्ग अवलंबण्याचे आवाहन सरकारला केले होते. पण तसे झाले नाही. फक्त दिल्लीच नाही तर बंगलोर, चंदिगढ आणि देशातल्या विविध भागांत अशा घटना रोज घडत आहेत. पण त्या रोखण्यासाठी काही ठोस उपाययोजना अजूनही अमलात आलेल्या नाहीत.
निर्माता पहलाज निहलानी म्हणाले, फक्त सरकारवर दोषारोप करून काहीही साध्य होणार नाही. समाजही यासाठी जबाबदार आहेच. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने आणि पर्यायाने समाजानेही काही पावले उचलली पाहिजेत, असे माङो स्पष्ट मत
आहे. (प्रतिनिधी)