Join us  

अभिनेत्री जीनत अमानने व्यावसायिकावर केला बलात्काराचा आरोप, गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2018 12:47 PM

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जीनत अमाननं जुहू पोलीस ठाण्यात एका व्यावसायिकाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. आता हे प्रकरण क्राइम ब्रँचकडे सोपवण्यात आलं आहे.

मुंबई- बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जीनत अमाननं जुहू पोलीस ठाण्यात एका व्यावसायिकाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. आता हे प्रकरण क्राइम ब्रँचकडे सोपवण्यात आलं आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एकेकाळी गाजलेली अभिनेत्री जीनत अमान हिला महिन्याभरापासून हा व्यावसायिक त्रास देत होता. तसेच तो धमकावत असल्याचाही आरोप जीनतनं केला आहे. त्या व्यावसायिकाला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी धमकी देत असल्याच्या आरोपाखाली आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.जीनत अमाननं 30 जानेवारीला मुंबईतल्या एका व्यावसायिकावर पाठलाग करणं आणि धमकावण्याचा आरोप केला होता. पोलिसांत दाखल असलेल्या तक्रारीनुसार, मुंबईतले व्यावसायिक सरफराज ऊर्फ अमन खन्ना(38) जीनत अमानचा गेल्या अनेक दिवसांपासून पाठलाग करत आहेत. आरोपी जीनत अमानला व्हॉट्सअॅपवर अश्लील मॅसेजही पाठवतो. त्याच्यावर अभिनेत्रीच्या घरी जाऊन अत्याचार करणे आणि सुरक्षारक्षकाला मारहाण करण्याचाही आरोप आहे. पोलिसांनी सरफराजविरोधात 354(डी) आणि महिलेला खुलेआम धमकी देण्याविरोधात 509 आयटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.  

टॅग्स :झीनत अमान