बोईसरला भारनियमन सुरू!

By Admin | Updated: May 29, 2014 01:50 IST2014-05-29T01:50:00+5:302014-05-29T01:50:00+5:30

एैन उन्हाळयात भारनियमनाच्या विळख्यात बोईसर सापडल्याने नागरिक प्रचंड त्रस्त झाले असून विजेशी निगडीत असलेले व्यवसायही ठप्प होत आहेत.

Boiser to start weightlifting! | बोईसरला भारनियमन सुरू!

बोईसरला भारनियमन सुरू!

बोईसर : बोईसर शहरातील पीसी-३ या फिडरवरील वितरण व वाणिज्य हानी वाढून भारनियमनाच्या तक्तयातील सी ग्रुपमध्ये पोहोचल्याने सकाळी सव्वा दोन तर संध्याकाळी अडीच असे एकूण पाऊणेपाच तासाचे आपत्कालिन भारनियमन सुरू केले आहे. एैन उन्हाळयात भारनियमनाच्या विळख्यात बोईसर सापडल्याने नागरिक प्रचंड त्रस्त झाले असून विजेशी निगडीत असलेले व्यवसायही ठप्प होत आहेत. पी.सी.तीन या फीडरवर भिमनगर, रूपरजतनगर, स्वरूपनगर, हार्मोनी कॉम्प्लेक्स, शिवकला आर्केड, विजय नगर, काटकर पाडा, भंडारवाडा, गणेश नगर, राणी शिगाव, गोसालीया पार्क, केशवनगर, खोदाराम बाग इत्यादी भागातील सुमारे ९०९१ वीज ग्राहकांना सध्या भारनियमनाला सामोरे जावे लागत आहे. तर बोईसर मधीलच ओसवाल एम्पायर व महागाव फीडर या दोन्ही फिडरवरील वितरण व वाणिज्य नियंत्रणात असल्याने दोन्ही मिळून सुमारे १०६७३ वीजग्राहकांना भारनियमनातून दिलासा मिळाला आहे. डिस्ट्रिब्युशन आणि कमर्शियल लॉसेस याचा आढावा घेण्याकरीता प्रत्येक महिन्याला एनर्जी आॅडीट होते आतापर्यंत महावितरण डीग्रुपपर्यंत भारनियमन करीत नव्हते. परंतु आता इमर्जन्सी लोड शेडींग सुरू केले आहे. तर भारनियमनाचे शेडयुल हे कळवा येथील लोड मॅनेजमेंट सेल येथुन वसई कांट्रोलहुन डायरेक्ट सब स्टेशनला भारनियमनाचे आदेश दिले जात असतात. हे फक्त आपत्कालिन भारनियमन असल्याने काही वेळा भारनियमनापासुन बोईसर तारापुरला सुटकाही मिळत.े तर भारनियमनातून सुटका मिळावायची असेल तर कमीत कमी डिस्ट्रीब्युशन लॉसेस व्हावेत याकरीता वीज वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांनी व कर्मचार्‍यांनी तप्तरता दाखवून अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. तर वीज ग्राहकांनीही वेळेवर व नियमित वीज बिले भरली तर डी.सी.एन.लॉस निश्चितच कमी होवुन भारनियमनातून सर्वाना मुक्तता मिळेल. कमर्शियल लॉसेस कमी करायचे असतील तर जुने मिटर बदली करून वीज चोरीवर नियंत्रण आणून टेक्नीकल लॉसेसची कारणे शोधून त्यावर त्वरीत व कडक उपाययोजना करावी लागेल. बोईसरच्या के व्ही फीडरवरून १३ विज चोर्‍या पकडल्या. ५२३७६ युनिटची विज चोरी होती, त्या वीज चोरांकडून ४ लाख ५ हजार रिक व्हर केले तर महागाव के व्ही फीडरवरून ९ वीज चोरांनी २४३५२ युनिटची वीज चोरी केली होती. त्यांच्याकडून १ लाख ८० रूपये वसूल करण्यात आले आहेत.

Web Title: Boiser to start weightlifting!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.