बलात्काराच्या घटनांनी बोईसर हादरले; एक आरोपी अल्पवयीन

By Admin | Updated: May 29, 2014 23:55 IST2014-05-29T23:43:06+5:302014-05-29T23:55:19+5:30

बोईसर पोलीस स्थानकक्षेत्रात बलात्काराच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या असून दोन्ही घटनेतील आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे

Boisar shocked by rape cases; One accused minor | बलात्काराच्या घटनांनी बोईसर हादरले; एक आरोपी अल्पवयीन

बलात्काराच्या घटनांनी बोईसर हादरले; एक आरोपी अल्पवयीन

बोईसर : बोईसर पोलीस स्थानकक्षेत्रात बलात्काराच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या असून दोन्ही घटनेतील आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे, तर एका घटनेत एका मुलीवर दोघांनी बलात्कार केल्याचे समोर आले असून दोघांपैकी एक आरोपी हा अल्पवयीन आहे. याबाबत बोईसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिडीत मुलगी तारापूर एमआयडीसीमधील एका कारखान्यात दोन वर्षांपूर्वी काम करीत होती. त्यावेळी तिची शफीक अहमद (२१) याच्याबरोबर मैत्री झाली. कालांतराने ती मुलगी नालासोपारा येथे राहण्यास गेली. शफीक व त्याचा साथीदार संतोष यादव (१६) हे दोघे नालासोपारा येथे जाऊन त्या मुलीला बोईसर येथे आणून बोईसर येथील चित्रालय सिनेमागृहात रात्री ९ ते १२ चा चित्रपट पाहिला. त्यानंतर त्या दोघांनी बीएआरसी हाऊसवेअर गोडाऊनमागे नेऊन रात्री तिच्यावर बलात्कार केला. बलात्कारानंतर ही पीडीत मुलगी तिच्या घरी न जाता बोईसर येथील तिच्या परिचित महिलांकडे २ ते ३ दिवस राहिली. पिडीत मुलीच्या आईला मुलीचा सुगावा लागताच आई बोईसर येथे येऊन मुलीला नालासोपारा येथे घेऊन गेली व २/३ दिवस कुठे होतीस याची विचारणा करताच तिने बलात्काराची घटना सांगितली. त्यानंतर याची नोंद नालासोपारा पोलीस स्थानकात झाली. तेथून बोईसरला केस येताच बोईसरचे सहाय्यक पोलीस निरिक्षक आबासाहेब पाटील व पीएसआय पोटे यांनी त्वरीत हालचाल करुन शफीक व संतोष या दोघांना अटक केली. संतोषला भिवंडीच्या रिमांडहोममध्ये पाठविण्यात आले, तर शफिकला २९ मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

Web Title: Boisar shocked by rape cases; One accused minor