बोईसरला सागाच्या लाकडाचे दोन ट्रक पकडले
By Admin | Updated: March 31, 2015 22:31 IST2015-03-31T22:31:13+5:302015-03-31T22:31:13+5:30
: सागाच्या जुन्या लाकडांनी भरलेले दोन ट्रक बोईसरहून मुंबईच्या दिशेने जात असल्याची खबर बोईसर येथील वनपरिक्षेत्र कार्यालयातील वनक्षेत्रपालांना

बोईसरला सागाच्या लाकडाचे दोन ट्रक पकडले
बोईसर : सागाच्या जुन्या लाकडांनी भरलेले दोन ट्रक बोईसरहून मुंबईच्या दिशेने जात असल्याची खबर बोईसर येथील वनपरिक्षेत्र कार्यालयातील वनक्षेत्रपालांना सोमवारी रात्री मिळताच त्यांनी त्यांच्या कार्यालयातील वनरक्षक व वनपालांच्या सहाय्याने बोईसर पूर्व भागातील खैराफाटक पोलीस चौकीवर सापळा रचून दोन्ही ट्रक लाकडांसहीत जप्त केले आहेत तर दोन्ही ड्रायव्हरलाही ताब्यात घेण्यात आले आहे.
बोईसरचे वनक्षेत्रपाल अशोक बुरसे यांना टिप मिळताच सोमवारी रात्री आठ च्या दरम्यान सापळा रचला असता हे दोन्ही ट्रक येताच बुरसे व त्यांच्या टीमने थांबवून चौकशी केली असता त्यांच्या जवळ लाकडांच्या वाहतुकीस लागणारा आवश्यक परवाना (ट्रान्झीट पास) बील व परवानगीही नव्हती. तद्नंतर दोन्ही ट्रक ताब्यात घेऊन पालघरचे वनसंरक्षक यांच्याकडे जमा
करण्यात आले असून पुढील कारवाई सुरू आहे.
पकडण्यात आलेली सागाची लाकडे ही जुन्या घराची असून त्याची लांबी, रूंदीची मोजमाप झाल्यानंतर त्या लाकडांचे मूल्य निश्चित होऊन सदर प्रकरण कोर्टात पाठविण्यात येईल असे वनक्षेत्रपाल अशोक बुरसे यांनी सांगुन या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)