रुग्णांच्या जीवाशी खेळताहेत बोगस डॉक्टर
By Admin | Updated: November 9, 2016 04:05 IST2016-11-09T04:05:54+5:302016-11-09T04:05:54+5:30
महापालिकेने आतापर्यंत शहरातील २७ बोगस डॉक्टरांवर गुन्हे दाखल केले आहेत. यामधील १७ डॉक्टर पालिका व पोलिसांचे लक्ष चुकवून बिनधास्तपणे व्यवसाय करत आहेत.

रुग्णांच्या जीवाशी खेळताहेत बोगस डॉक्टर
नामदेव मोरे , नवी मुंबई
महापालिकेने आतापर्यंत शहरातील २७ बोगस डॉक्टरांवर गुन्हे दाखल केले आहेत. यामधील १७ डॉक्टर पालिका व पोलिसांचे लक्ष चुकवून बिनधास्तपणे व्यवसाय करत आहेत. रूग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या या डॉक्टरांची झाडाझडती सुरू झाली असून दोघांचे दवाखाने सील केले असल्याने बोगस डॉक्टरांचे धाबे दणाणले आहे.
नवी मुंबईमधील गावठाण व झोपडपट्टी परिसरामध्ये बोगस डॉक्टर व्यवसाय करत असल्याचे निदर्शनास आले आहे. गतवर्षी सारसोळे गावातील डॉ. दत्तात्रय आगदे याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला अटक केली होती. यानंतर दारावेमध्ये व्यवसाय करणाऱ्या बोगस डॉक्टर आरोटेलाही पोलिसांनी अटक केली होती. महापालिका प्रशासन नागरी आरोग्य केंद्राच्या माध्यमातून शहरात कुठे बोगस डॉक्टर कार्यरत आहे का याची माहिती घेत असते. पालिकेच्या स्थापनेपासून आतापर्यंत तब्बल २७ डॉक्टरांविरोधात पालिकेने स्वत: गुन्हे नोंद केले आहेत. मे महिन्यामध्ये फेरसर्वेक्षण केले असता १७ जणांचे दवाखाने सुरूच असल्याचे निदर्शनास आले होते. त्याच विभागात जागा बदलून किंवा काहींनी विभाग बदलून गरीब रूग्णांना फसविण्याचा धंदा सुरू ठेवला आहे. अशा डॉक्टरांवर पुन्हा गुन्हे दाखल करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. करावे गाव सेक्टर २३ मध्ये दत्तात्रय विश्वनाथ देडे याचा दवाखाना ३ नोव्हेंबरला सील करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. दवाखाना सील केल्यामुळे पुन्हा त्याला रूग्णांची फसवणूक करता येणार नाही. तुर्भे नाक्यावरही एम. ए. शेख हा बोगस डॉक्टर अनेक वर्षांपासून व्यवसाय करत आहे. महापालिकेने गुन्हा दाखल केल्यानंतरही त्याने व्यवसाय बंद केलेला नाही. ५ नोव्हेंबरला पालिकेच्या वैद्यकीय विभागाने त्याचा दवाखानाही बंद केला आहे.
दोन बोगस डॉक्टरांचे दवाखाने बंद केल्यामुळे इतरांचे धाबे दणाणले आहे. शहरामध्ये वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांकडे महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम १९३१ च्या कलम ३३ (१) नुसार डॉक्टरांनी संबंधित वैद्यकीय परिषदेकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानुसार अॅलोपॅथी व्यावसायिकांसाठी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल, आयुर्वेदिक व्यावसायिकांसाठी महाराष्ट्र कौन्सिल आॅफ इंडियन मेडिसीन, होमिओपॅथीसाठी महाराष्ट्र कौन्सिल आॅफ होमिओपॅथी व दंत चिकित्सकांनी महाराष्ट्र स्टेट डेंटिस्ट कौन्सिलकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. चारपैकी कोणत्याही एका संस्थेकडे नोंदणी नसणाऱ्यांना वैद्यकीय व्यवसाय करता येत नाही. पण हे सर्व नियम धाब्यावर बसवून अनेकजण इतर राज्यातील वैद्यकीय पदवी असल्याचा बहाणा करून किंवा बोगस पदवी मिळवून व्यवसाय करत आहेत.
या डॉक्टरांमुळे रूग्णांचा मृत्यू होण्याची शक्यता असल्याने त्यांच्याविरोधात जोरदार मोहीम सुरू केली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक परोपकारी, डॉ. वसंत माने व इतर डॉक्टरांनी ही कारवाई केली.
दवाखाना सुरू असलेले बोगस डॉक्टर
नावकार्यक्षेत्र
दत्तात्रय विश्वनाथ देडेकरावे
रामनरेश सोमारी शर्मातुर्भे
एम. ए. शेखइंदिरानगर
मोहम्मद जहांगीर आलमतुर्भे
यादव बंटुराम रामकरण तुर्भे
सिद्दीकी रियाजुद्दीन खैरणा
आजाद रामपलटखैरणा
सुनील कुमार सिंगमहापे
दगडू साहेबराव ठाकरेकातकरीपाडा
कैलासचंद जनार्दन पांडेमहापे
भारत यू. शर्माकातकरीपाडा
राजेंद्र भिला पाटीलचिंचपाडा, ऐरोली
सुजन कुमार राय चिंचपाडा
विश्वकर्मा राकेश रामअवधइलठाणपाडा
दिलबीर सिंगनेरूळ
बालासाहेब बागलराबाडा
दवाखाना बंद आढळलेले बोगस डॉक्टर
जावेद अख्तर खानतुर्भे
विद्या वाचस्पती शर्मातुर्भे
रियाजुद्दीन खानइंदिरानगर
ए. के. पांडेइंदिरानगर
सोनालिनी बॅनर्जीखैरणा
सिंग सुरेंद्र बहादूर बबनसिंगमहापे
रामअवध विश्वनाथ यादवपावणा
देबाशीश कुमारनोसील नाका
विनोद सुदामराव बरडेचिंचपाडा
कुरून एस थॉमस वाशी
नेमीचंद विठ्ठल राठोडराबाडा