विहारमध्ये बुडालेल्या तरुणाचा मृतदेह सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2016 01:57 IST2016-07-06T01:57:32+5:302016-07-06T01:57:32+5:30

विहार तलावामध्ये बुडालेल्या तरुणाचा अखेर दोन दिवसांनंतर मृतदेह सापडला. शिबू राठोड (३८) असे मृत तरुणाचे नाव असून, तो पोहण्यासाठी विहार तलावामध्ये उतरला होता.

The body of a young man trapped inside the house was found | विहारमध्ये बुडालेल्या तरुणाचा मृतदेह सापडला

विहारमध्ये बुडालेल्या तरुणाचा मृतदेह सापडला

मुंबई : विहार तलावामध्ये बुडालेल्या तरुणाचा अखेर दोन दिवसांनंतर मृतदेह सापडला. शिबू राठोड (३८) असे मृत तरुणाचे नाव असून, तो पोहण्यासाठी विहार तलावामध्ये उतरला होता.
रविवारी सुटी असल्याने मित्रांसोबत तलावामध्ये पोहण्यासाठी शिबू आला होता. दारूपार्टीचा बेत उरकल्यानंतर तो पाण्यात उतरला. मात्र खोलीचा अंदाज न आल्याने तो बुडायला लागला. रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध घेतल्यानंतर याबाबत मुलुंड पोलिसांना कळविण्यात आले. अग्निशमन दलासह मुलुंड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत राठोडचा शोध सुरू केला. अखेर मंगळवारी सायंकाळच्या सुमारास राठोडचा मृतदेह पोलिसांना सापडला. मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The body of a young man trapped inside the house was found