पश्चिम बंगाल, बांगलादेशमधील मुलींकडून देहव्यापार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 00:50 IST2020-01-05T00:50:23+5:302020-01-05T00:50:26+5:30
दहिसरमधील एका खोलीत देहव्यापार करणाऱ्या दलालाला शनिवारी अटक करण्यात आली.

पश्चिम बंगाल, बांगलादेशमधील मुलींकडून देहव्यापार
मुंबई : दहिसरमधील एका खोलीत देहव्यापार करणाऱ्या दलालाला शनिवारी अटक करण्यात आली. ही कारवाई शनिवारी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कक्ष १२ ने केली. संजय दास (३३) असे अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे.
दहिसर पूर्वच्या रावळपाडा परिसरात गिरी निवास चाळीत देहव्यापार चालत असल्याची माहिती गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कक्ष १२चे पोलीस निरीक्षक सचिन गवस यांना मिळाली. त्यानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सागर शिवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली गवस, सहायक पोलीस निरीक्षक विक्रमसिंह कदम, अतुल आव्हाड, पोलीस नाईक मंगेश तावडे यांनी सापळा रचला. त्यानंतर, संबंधित चाळीत धाड टाकण्यात आली.
त्यावेळी तीन मुलींकडून दास हा देहव्यापार करवून घेत असल्याचे त्यांना समजले. यातील दोन मुली पश्चिम बंगाल, तर तिसरी बांगलादेशची रहिवासी असल्याचे तपासात उघड झाले. त्यानुसार, त्यांची सुटका करत दास याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या.