शिरसाड येथे बॅगमध्ये मृतदेह
By Admin | Updated: September 27, 2014 00:11 IST2014-09-27T00:11:38+5:302014-09-27T00:11:38+5:30
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर शिरसाड येथे मोरीत बॅगमध्ये भरलेला एका अनोळखी तरूणाचा मृतदेह सापडला

शिरसाड येथे बॅगमध्ये मृतदेह
पारोळ : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर शिरसाड येथे मोरीत बॅगमध्ये भरलेला एका अनोळखी तरूणाचा मृतदेह सापडला. तो मृतदेह तीन दिवसापासुन सुटकेसमध्येच होता. ज्यावेळी त्या मोरीमध्ये दुर्गंधी येऊ लागली तेव्हा तिचा शोध घेतला असता पोलिसांना ही सुटकेस मिळाली. ती उघडली असता मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले.
या तरूणाचा दोरीने गळा आवळून खून झाल्याचा पोलीसांचा अंदाज आहे. तसेच हा मृतदेह या परिसरातील तरूणाचा नसल्यामुळे पोलीसांनी मुंबई पोलीसांना मृतदेहाची माहिती दिली आहे. हा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून पुढील तपास मांडवी पोलीस करीत आहेत. (प्रतिनिधी)