Join us

मुंबईतील वरळी समुद्रात बोट बुडाली, एकजण बुडाल्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 15:07 IST

मुंबईतील वरळी समुद्रात बोट बुडाल्याचे वृत्त आहे. या घटनेत एक जण बेपत्ता असून सहा जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

मुंबई: मुंबईतील वरळी समुद्रात बोट बुडाल्याचे वृत्त आहे. या घटनेत एकजण बेपत्ता असून सहा जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील वरळी समुद्रात दुपारी रेवती नावाची बोट बुडाल्याची घटना घडली. या घटनेत बोटीतील एक प्रवासी बेपत्ता असल्याचे समजते. तसेच, घटनास्थळी दाखल झालेल्या तटरक्षक दलाच्या जवानांनी सहा ते सात प्रवाशांना वाचविले आहे. याचबरोबर, तटरक्षक दलाचे जवान बेपत्ता असलेल्या एका प्रवासाचा शोध हेलिकॉप्टर आणि बोटीच्या मदतीने घेत आहेत. 

 

सविस्तर वृत्त लवकरच...

टॅग्स :मुंबई